शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बालेवाडी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये सोयी सुविधा आणि स्वच्छतेचा अभाव; नागरिकांकडून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 20:43 IST

अनेक नागरिकांना आपल्याला कोरोना झाला आहे किंवा नाही याबाबत कल्पना देण्यात आलेली नाही..

ठळक मुद्देनागरिक त्यांचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट मिळावेत अशी करत आहेत मागणी

पाषाण :  पुणे शहरातील विविध भागातून कोरोना बाधित असलेले रुग्ण तसेच क्वारंटाईन करण्यात आलेले नागरिक यांच्या वर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने निकमार कॉलेजमध्ये सेंटर उभारण्यात आले आहे. 

पुणे महानगरपालिकेच्या वतीने बालेवाडी येथे तयार करण्यात आलेले निकमार कॉलेजमधील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत योग्य माहिती न मिळाल्याने संताप व्यक्त करत आहेत. तसेच योग्य सुविधा मिळत नसल्याने या सेंटरवर असलेले अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याचप्रमाणे बरे होऊन बाहेर पडलेल्या काही नागरिकांनी देखील सुविधांबाबतच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

अनेक नागरिकांना आपल्याला कोरोना झाला आहे किंवा नाही याबाबत कल्पना देण्यात आलेली नाही. तर कोणतीही लक्षणे आढळत नसलेल्या लोकांना देखील या ठिकाणी ठेवण्यात आले असल्याची तक्रार नागरिक करत आहे. काही नागरिकांना फक्त तोंडी कोरोना झाला असल्याचे सांगितले जात आहे. नागरिक त्यांचे टेस्टचे रिपोर्ट मिळावेत अशी मागणी करत आहेत. 

 निकमार सेंटरमध्ये नागरिकांना प्यायला गरम पाणी दिले जात नाही तर अनेक नागरिक आपल्या नातेवाइकांकडून गरम पाणी आणत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आंघोळीला गरम पाणी नसल्याने थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. यामुळे सर्दी खोकला यासारखे देखील वाढत असल्याचे काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. जेवणाची गुणवत्ता याबाबत देखील अनेक नागरिक तक्रार करतात. परंतु, याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. परिसराच्या स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करून देखील कारवाई केली जात नाही तसेच रुग्णांना देण्यात आलेल्या खोल्यांची स्वच्छता देखील वेळेवर होत नाही.खोलीमध्ये दररोज आरोग्य तपासणी व्हावी स्वच्छता तसेच साफसफाई नियमित केली जावी व गरम पाणी देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. 

 क्वारंटाईन असलेले धनराज मोरे म्हणाले, आमची टेस्ट केल्यानंतर आम्हाला करून झाला आहे असे सांगून सेंटरमध्ये करण्यात आले आहे. परंतु येथे आल्यानंतर देण्यात आलेल्या रूमची स्वच्छता करण्यात आली नव्हती. गुणवत्ता पूर्ण जेवण दिले जात नाही दररोज चेक देखील केले जात नाही. आजारी पडलेल्या रुग्णांना स्वतः खाली डॉक्टरांकडे जावे लागते.  क्वारंटाईन केलेले नागरिक व रुग्ण यांची दररोज आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे असे असताना देखील आरोग्य तपासणी होत नाही. 

सहाय्यक आयुक्त जयदीप पवार म्हणाले,  वाढत असलेल्या पेशंटची संख्या यामुळे यंत्रणेवरील ताण वाढत आहे. समस्या लक्षात आल्यानंतर तात्काळ उपाय योजना करण्यात येत आहे.

टॅग्स :Balewadiबालेवाडीcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका