शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

स्वमालकीच्या घरांवर कुऱ्हाड

By admin | Updated: June 29, 2017 03:49 IST

एकीकडे पंतप्रधान देशातील जनतेला स्वस्त घरांची स्वप्ने दाखवत आहेत, तर दुसरीकडे त्यांचीच सत्ता असलेल्या पुणे महापालिकेत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : एकीकडे पंतप्रधान देशातील जनतेला स्वस्त घरांची स्वप्ने दाखवत आहेत, तर दुसरीकडे त्यांचीच सत्ता असलेल्या पुणे महापालिकेत सत्ताधारी सर्वसामान्य जनतेसाठी घरे महाग होतील, असा निर्णय घेत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी वाढीव विकसन शुल्काच्या निर्णयावर केली. लहान घरे २ लाखाने तर मोठी घरे किमान ६ लाखाने महाग होतील, असे ते म्हणाले. शिवाय जीएसटी या नव्या करप्रणालीमुळेही घरांच्या दरात मोठा फरक पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपाने मंगळवारी बांधकाम विकसन शुल्क दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सभागृहात कोणीही विरोधक उपस्थित नव्हते. त्यामुळेच या निर्णयावर बोलताना तुपे यांनी बुधवारी सांगितले, की त्यांच्या चांगल्या निर्णयांना आम्ही विरोध करतो, असे ते म्हणत असतात. मंगळवारी सभागृहात एकही विरोधक नसताना त्यांना चांगले निर्णय घेणे सहज शक्य होते, मात्र त्यांनी विकसन शुल्कात वाढ करण्यासारखा अनिष्ट निर्णय घेतला. यात सर्वसामान्यांचे स्वमालकीच्या घराचे स्वप्न महाग होणार आहे.देशाचे त्यांच्याच पक्षाचे पंतप्रधान जनतेला स्वस्त घरे मिळावीत, यासाठी विविध योजना जाहीर करीत आहे. त्या योजनांना हरताळ फासणारा हा निर्णय आहे. राज्य सरकारच्या दबावाखाली महापालिका प्रशासनाने सत्ताधाऱ्यांची दिशाभूल करून हा निर्णय मंजूर करून घेतला. या निर्णयामुळे पुणे शहरातील लहान घरे २ लाख रुपयांनी तर मोठी घरे किमान ६ लाख रुपयांनी महाग होतील. आधीच घरांच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात आता भरच पडणार आहे. जीएसटी या नव्या करप्रणालीमुळेही घरांच्या किमती वाढणार आहे, असे तुपे म्हणाले. याआधी १ टक्का मुद्रांक शुल्क व साडेचार टक्के कर याप्रमाणे साधारण साडेपाच टक्के रक्कम घराच्या एकूण किमतीवर सरकारला कर म्हणून द्यावी लागत होती. नव्या करप्रणालीत नवी घरे सहा टक्के गटात गेली आहेत. त्यामुळे आता या करातही केंद्र सरकारने वाढच केली आहे. त्यातूनही घरांच्या किमती वाढतील, असे तुपे यांनी सांगितले.