शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभला ग्रामस्वच्छता फेरी

By admin | Updated: November 16, 2016 02:49 IST

कुरकुंभ (ता. दौंड) येथील फिरंगाई माता विद्यालया तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून स्वच्छ भारताचा नारा देत समाजातील

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील फिरंगाई माता विद्यालया तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून स्वच्छ भारताचा नारा देत समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून गावाचा विकास आराखडा राबविण्याचा उपक्रम केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वच स्तरांवर राबविण्यात येत असताना शालेय विद्यार्थ्यांतदेखील याबाबत जागरूकता निर्माण करून सर्व गावांतील नागरिकापर्यंत त्याची माहिती पोहोचवण्याचे काम केले जात आहे. स्वच्छतेच्या या उपक्रमात जवळपास सर्वच गावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्वच्छता करण्याचा उपक्रम यशस्वी होताना दिसतो. मात्र, हा उपक्रम अशाच प्रकारे चालू राहून त्याची अंमलबजावणी कायम होत राहावी व त्यातूनच ग्रामविकास साधता यावा. यामुळे याची जागरूकता सर्वच स्तरांत निर्माण करण्याचा प्रयास केला जात आहे.या प्रसंगी कुरकुंभचे उपसरपंच रशीदभाई मुलाणी, प्राध्यापिका अलका ढेरे, प्राचार्य नानासाहेब भापकर, संदीप भागवत व अन्य शिक्षक उपस्थित होते.कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनदेखील ग्रामस्वच्छता अभियानाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन सर्वच स्तरांवर जागरूकता निर्माण केली आहे. या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकामसुद्धा करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामस्वच्छता ही मानसिकता ठेवूनच गावाचा विकास साधण्याचा प्रयास करीत असल्याची प्रतिक्रिया या वेळी उपसरपंच रशीद मुलाणी यांनी व्यक्त केली. (वाार्ताहर)