शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

कुंभारगावचा शेतकरी विकतो ऑनलाईन भाजीपाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 02:05 IST

ऑनलाईन मोबाईल, घड्याळे टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळते.

भिगवण : ऑनलाईन मोबाईल, घड्याळे टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळते. परंतु स्थानिक भाजीविक्रेत्याकडून आॅनलाईन भाजी मिळते हे ऐकायला नवल वाटतंय ना. मात्र हे खरे करून दाखवले आहे कुंभारगाव येथील कुंडलिक धुमाळ या प्रग्ाितशील शेतकऱ्याने. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून परिसरातील ग्राहक विषमुक्त भाजीपाला खरेदी करीत आहेत.आजच्या काळात शेती करणे तोट्याचे असल्याचे म्हटले जाते. तर काही पीक पद्धतीतून रासायनिक खते आणि औषधावर केलेला खर्चही वसूल होत नसल्यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकू लागल्याची आणि कर्जाच्या डोंगरामुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. मात्र काही शेतकरी आपल्या कल्पकतेतून शेती व्यवसायसुद्धा फायदा मिळवून देतो याचे उदाहरणासह दाखवून देतात. कुंभारगाव येथील माजी सरपंच कुंडलिक धुमाळ यांनी आपल्या शेतात अनेक प्रकारच्या विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला लावून त्याचे मार्केटिंग केले आहे. त्यासाठी धुमाळ यांनी मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या ग्राहकांचा ग्रुप बनवून त्यावर रोज कोणत्या भाज्या उपलब्ध आहे, याची माहिती देण्यात येते. इतकेच काय त्या भाजीचा फोटो टाकण्यात येतो. त्यामुळे या ग्रुपवरील महिला सदस्या आवश्यक असणाºया भाजीची आॅर्डर देतात. त्यामुळे कोणाला कोणती भाजी पाहिजे त्याप्रमाणे ही भाजी पोहचविण्याची व्यवस्था केली जाते. यात धुमाळ यांना त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी या संपूर्ण कुटुंबाची मदत मिळते. या ग्रुपवर विशेष करून भिगवण येथील वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर, मेडिकल व्यावसायिक आणि वकील यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. तर आजच्या काळात रासायनिक औषधामुळे विषयुक्त भाजीपाला पिकविला जात असताना धुमाळ मात्र सेंद्रिय भाजीपाला पिकविणे आणि विकणे याकडे लक्ष केंद्रित करीत असताना दिसून येत आहेत. यामुळे शेतीमध्ये नफा नाही म्हणणाºया शेतकºयांसाठी हे उत्तम उदाहरण असल्याचे नक्कीच मानता येईल.