शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कोथरूड कचरा डेपोला तीन दिवसांपासून आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:20 IST

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून कोथरूड परिसरातील कचरा डेपोतील आग धुमसत आहे. अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही ...

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून कोथरूड परिसरातील कचरा डेपोतील आग धुमसत आहे. अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही आग विझवण्याचे काम सुरू होते. सुमारे साडेचार एकर परिसरात आग पसरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसांत पावसामुळे झाडपडीच्या घटना घडल्या होत्या. तसेच पालिका प्रशासनातर्फे धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. या झाडांच्या फांद्याचे ढीग कोथरूड कचरा डेपो परिसरात टाकण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून या फाद्यांच्या ढिगांना आग लागत आहे. अग्निशामक विभागाच्या कर्मचाºयांनी ही आग विझविली होती. मात्र, पुन्हा शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या फाद्यांना आग लागली. त्यामुळे सकाळी ११ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अग्निशामक विभागाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू होते.

अग्निशामक विभागाचे गजानन पाथरूडकर म्हणाले, झाडांच्या फाद्यांचे सुमारे १0 फुटांचे १५ ते २0 ढीग या ठिकाणी पडलेले आहेत. या ढिगांना दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. ही आग विझविण्यात आली होती. मात्र, या परिसरात मोठ्या प्रमाणावर राख साचलेली आहे. तसेच अर्ध्या जळालेल्या फांद्यांवर माती टाकून पुन्हा त्यावर पाणी टाकावे लागते. त्यामुळे आग विझविण्यास वेळ लागत आहे. मात्र, सायंकाळी सात वाजल्यानंतर ही आग अधिकच पसरल्याचे दिसून आले.

पालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दुपारी व रात्री उशिरा कचरा डेपोला लागलेल्या आगीची पाहणी केली. ही जागा मेट्रो प्रकल्पासाठी असून त्या ठिकाणी सतत आग लागत आहे. अग्निशामकचे विभागीय अधिकारी सुनील गिलबिले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांकडून आग विझविण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :dumpingकचराfireआग