शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पुणे-नाशिक मार्गाची कोंडी सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:32 IST

तुटपुंज्या उपायजोजना : प्रवाशांची होतेय गैरसोय; कायमस्वरूपी नियोजनाची मागणी

आंबेठाण : पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अनेक पर्याय निवडले जात आहेत. मात्र मुख्य मार्गावरील दुतर्फा बेकायदेशीरपणे पार्किंग केलेली वाहने तसेच सर्व्हिस रस्त्यावर अनेक ठिकाणी साचणारे पावसाचे पाणी यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे.

चाकणमध्ये वाढत्या औद्योगिकरणाबरोबर वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, वाढत्या वाहतूकीचा भार उचलण्यासाठी तुलनेने रस्ते कमी पडू लागले. त्यात रस्त्यालगतची अतिक्रमणे, चाकण ते भोसरी दरम्यानची अवैध वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, सीएनजी किटवरील तीन चाकी रिक्षा सुरू झाल्या आहेत. यावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. गेल्या महिन्यापासून वाहतूककोंडीत भर पडली आहे. यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत.पुणे-नाशिक महामार्गावर चिंबळी फाटा, मोई फाटा, कुरुळी फाटा, एमआयडीसी फाटा, आळंदी फाटा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक; तसेच चांडोली टोल नाका ते राजगुरुनगर बाजार समिती कार्यालयापर्यंत वाहनांच्या कायम रांगा लागलेल्या असतात. आयआरबी ही रस्ते कंपनी दोन ठिकाणी या रस्त्यावर टोल आकारते; पण रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने पार्किंग केली जात आहे. तसेच सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे. तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत याकडे दुर्लक्ष करत आहे. नव्याने चाकण शहरात दाखल झालेल्या वाहतूक पोलिसांकडून यावर आळा घालुन वाहतूककोंडी सोडविण्यासाठी योग्य प्रकारे पावले उचलली जावीत, अशी मागणी प्रवाशी नागरिक करत आहेत. पोलिसांनी नुसतेच वाहनांचे फोटो काढून दंड वसूल करण्यात धन्यता मानू नये.बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्याची मागणीवाहतूककोंडीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण विरुद्ध बाजूने ये-जा करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. रहदारीस अडथळा ठरणाºया वाहनांवर कारवाई केली पाहिजे.अवैध वाहतुकीचा अडथळा चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर, चाकण-आंबेठाण तसेच चाकण ते भोसरी या मार्गावर कमी जास्त प्रमाणात अवैध वाहतूक चालते. ही वाहने महामार्गावर चौकात अस्ताव्यस्त लावलेली असतात. पोलिसांकडून या वाहनांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे फावते आहे.

टॅग्स :Puneपुणे