शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे कोंढापुरीचा तलाव पडला कोरडाठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:07 IST

पंधरा दिवसांपासून पाणीटंचाई : धरण उशाला आणि कोरड घशाला

रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथे गेल्या पंधरा दिवसांपासून तलावामध्ये पाणीसाठाच शिल्लक नसल्याने अनेक वर्षांपासून न जाणवलेल्या भीषण दुष्काळाचे चटके कोंढापुरी गाव व इतर पंचक्रोशीमध्ये जाणवू लागले आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’अशी स्थिती कोंढापुरी ग्रामस्थांवर आली आहे.

तरी त्वरित कोंढापुरी तलावात पाणी सोडण्याची मागणी भास्कर गायकवाड, शांताराम गायकवाड; तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राहुल दिघे, संतोष गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे शेतकरी यांचे अतोनात हाल होत असून, तसेच पिण्यासाठी कोंढापुरी तलावावर अवलंबून असलेली पाणीपुरवठा योजना कोंढापुरी, रांजणगाव गणपती, निमगाव म्हाळुंगी, खंडाळे, गणेगाव, शिक्रापूर या गावांच्या योजना असल्यामुळे पिण्यासाठी पाणी सोडणे आवश्यक आहे. मागील आवर्तनामध्ये कोंढापुरी तलावांमध्ये कमी प्रमाणात पाणी सोडलेले होते, तरी त्यामुळे पाणीसाठा काही दिवस शिल्लक राहिल्याने शेतमाल जळत असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या कोंढापुरी, गणेगाव, खंडाळे व आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये झालेली आहे, तरी तलावामध्ये पाणी सोडणे महत्त्वाचे असून लवकरात लवकर पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहेसलग दोन वर्षे झालेल्या पावसाचे कमी प्रमाण त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. एकंदरीत दुष्काळी परिस्थिती आणि गेल्या दोन वर्षांमध्ये शेतमालाला असलेला नीचांकी बाजारभाव यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.कोंढापुरीमध्ये काही दिवसांपासून दिवसाआड पाणी सोडण्याचे काम चालू झालेले आहे, काही दिवसांतच टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी लागणार असे दिसत आहे. 

टॅग्स :Puneपुणे