शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

किशोरी आमोणकर यांच्या सुहृदांनी सांगितलेल्या त्यांच्या सुरेल आठवणी पुस्तकरुपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 17:45 IST

पुण्यातील रिदम वाघोलीकर या तरुणाने किशोरीतार्इंच्या सुहृदांनी आणि शिष्यांनी सांगितलेल्या त्यांच्याविषयीच्या सुरेल आठवणी पुस्तकरुपात उतरवल्या अहेत.

ठळक मुद्देतेजश्री आमोणकर यांनी केले पुस्तकाचे संपादन वाचायला मिळणार सहसा वाचायला न मिळणाऱ्या आठवणी

पुणे : हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील अखंड तपश्चर्येचे दुसरे नाव म्हणजे गानसरस्वती विदूषी किशोरी आमोणकर. या तेजस्वी आणि परिपूर्ण स्वरांच्या मागच्या किशोरीतार्इंना जाणून घेण्याची सुवर्णसंधी आता संगीत रसिकांना प्राप्त होणार आहे. पुण्यातील रिदम वाघोलीकर या तरुणाने किशोरीतार्इंच्या सुहृदांनी आणि शिष्यांनी सांगितलेल्या त्यांच्याविषयीच्या सुरेल आठवणी पुस्तकरुपात उतरवल्या अहेत.

'द सोल स्टिरिंग व्हॉईस-गानसरस्वती किशोरी आमोणकर' नावाचे हे पुस्तक किशोरी आमोणकर यांच्यावर इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या मोजक्या पुस्तकांमधील एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. विशेष म्हणजे किशोरीताईंच्या नात तेजश्री आमोणकर यांनी पुस्तकाचे संपादन केले आहे. नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारपासून पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या गानसरस्वती महोत्सवात ४ फेब्रुवारी २०१८ रोजी या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात येणार आहे.रिदम वाघोलीकर हे युवा संगीत अभ्यासक असून संगीतासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या महान कलाकारांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक रसिक म्हणून शोध घेणे ही त्यांची विशेष आवड आहे. यापूर्वी त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर 'स्वरलता' हे पुस्तक लिहिले असून ग्रामोफोनच्या आकारात प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पुस्तकाने वाचकांची वाहवा मिळवली होती. आता त्यांनी लिहिलेल्या किशोरीताईंवरील या नवीन पुस्तकात ताईंच्या आप्तेष्टांनी व शिष्यांनी सांगितलेल्या आणि सहसा वाचायला न मिळणाऱ्या आठवणी वाचायला मिळणार आहेत. रिदम यांनी या पुस्तकासाठी ठुमरीसम्राज्ञी गिरीजा देवी यांचीही खास मुलाखत घेतली असून गिरीजादेवींच्या स्मरणातील किशोरीताई कशा होत्या हे त्यांनी उलगडले आहे. पुस्तकाची संकल्पना व स्वरूप रचना खडीकर-शहा यांच्या कल्पनेतून साकारले आहे.

टॅग्स :Puneपुणे