शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गोळ्या घालून तरूणाचा खून

By admin | Updated: June 2, 2015 04:59 IST

येथे चार अज्ञात हल्लेखोरांनी २८ वर्षांच्या तरुणावर गोळीबार करून निर्घृण खून केला असल्याची घटना आज ( दि. १ जून) सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली असून,

चाकण : मुटकेवाडी ( ता. खेड ) येथे चार अज्ञात हल्लेखोरांनी २८ वर्षांच्या तरुणावर गोळीबार करून निर्घृण खून केला असल्याची घटना आज ( दि. १ जून) सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली असून, चाकण पोलिसांनी चार अज्ञात फरारी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील व उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन राजेंद्र भुरूक (वय २८, रा. मुटकेवाडी, चाकण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळपासूनच अज्ञात हल्लेखोर रोहन यांच्या घरालगत दबा धरून बसले होते. याबाबत त्यांच्या पत्नीने रोहन यांना दोन तरुण आपल्या घराकडे पाहत असल्याचे सांगितले, परंतु कुणीतरी असेल असे म्हणून त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. सकाळी पावणेअकराच्या सुमारास रोहन हे बाहेर जाण्यासाठी घरातून खाली आले असता, त्यांनी बंगल्याच्या पार्किंगमध्ये असलेल्या दोन तरुणांना 'काय रे पोरांनो इथं काय करता? ' असे हटकले. ते पत्नीने गॅलरीत ऐकले व क्षणार्धात गोळीबाराचा आवाज झाला. हल्लेखोरांनी रोहनवर रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी उजव्या हाताच्या दंडाला चाटून गेली, तर दुसरी गोळी उजव्या डोळ्याखालून डोक्यात घुसल्याने प्रचंड रक्तस्राव झाला व तो जमिनीवर कोसळला. या वेळी त्यांच्या पत्नीने चार जणांना पळून जाताना पहिले. गंभीर जखमी झालेल्या रोहनला प्राथमिक उपचारासाठी येथील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिक व्यावसायिक-व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. चाकण पोलिसांनी चार अज्ञात फरारी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत. हा गोळीबार व तरुणाचा खून कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप निष्पन्न झाले नसून, घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. चाकण पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)