शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

...अडीच तासांत पुण्याहून किडनी नाशिकला

By admin | Updated: May 28, 2017 22:07 IST

पुण्याच्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधून शनिवारी (दि़२७) सायंकाळी किडनी घेऊन निघालेली अ‍ॅम्ब्युलन्स अवघ्या अडीच तासांत अपोलो हॉस्पिटलमध्ये पोहोचली़.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पुण्याच्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधून शनिवारी (दि़२७) सायंकाळी किडनी घेऊन निघालेली अ‍ॅम्ब्युलन्स अवघ्या अडीच तासांत अपोलो हॉस्पिटलमध्ये पोहोचली़ पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी केलेल्या ग्रीन कॉरिडोअरमुळे हे शक्य झाले़ विशेष म्हणजे महामार्गावर काम सुरू असतानाही चिंचोली फाटा ते अपोलो हॉस्पिटल हे अंतर अ‍ॅम्ब्युलन्सने केवळ २० मिनिटांमध्ये पार केले़पुण्याच्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधून सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास अ‍ॅम्ब्युलन्स (एमएच १५, इएफ ००६२) किडनी  घेऊन नाशिकला निघाली़ या अ‍ॅम्ब्युलन्सला पुणे शहर, पुणे ग्रामीण पोलीस, नगर ग्रामीण पोलीस, नाशिक ग्रामीण पोलीस यांच्या सहकार्यामुळे रात्री चिंचोली फाट्यावर पोहोचता आले. शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सिरसाठ, चालक ढाकणे, काकड, जाधव यांच्या पथकाने या अ‍ॅम्ब्युलन्ससाठी वाट करून दिली़शहर पोलिसांच्या सहकार्यामुळे चिंचोली फाटा, सिन्नर फाटा, बिटको, जेलरोड मार्गे नांदूर नाका, स्वामीनारायण मंदिर ते अपोलो हॉस्पिटलपर्यंतचा मार्ग अवघ्या २० मिनिटांमध्ये पार करीत ९ वाजता ही अ‍ॅब्युलन्स अपोलो हॉस्पिटलमध्ये पोहोचली़ नाशिकरोड, उपनगर, आडगाव व पंचवटी पोलीस ठाण्याची सीआर मोबाइल व्हॅन, वाहतूक शाखेचे पोलीस यांच्या सुयोग्य नियोजनामुळे ही अ‍ॅब्युलन्स वेळेत दाखल झाली. तर नागरिकांनीही या ग्रीन कॉरिडोरला चांगले सहकार्य केले.