शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणीनगरमध्ये मुलाला कुत्र्याचा चावा, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:54 IST

मोकाट कुत्र्यांची दहशत वाढतेय : भोसरी व परिसरातील समस्या

भोसरी : भटक्या कुत्र्यांची भोसरी आणि परिसरात दहशत वाढत आहे. इंद्रायणीनगरमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे. गवळीनगर वसाहतीमध्ये ही घटना घडली प्रणय कदम असे या मुलाचे नाव आहे. शहरातील बहुतांश सर्व भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री फिरत असतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनस्वार, कामगार यांची पाचावर धारण बसते. रात्री-अपरात्री कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. लहान मुलांनाही मोकाट कुत्र्यांकडून इजा पोहोचल्याच्या घटना घडल्या आहेत. मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्याही लक्षणीय आहे.

रस्त्यावरून सतत धावणाºया कुत्र्यांमुळे अनेकदा अपघातांना आमंत्रण मिळाले आहे. रात्रीच्या वेळी त्यांच्या भुंकण्याने नागरिकांची झोपमोड तर होतेच; त्याबरोबर रस्त्यावरून चालताना असुरक्षितता वाटते. कुत्रे गटागटाने फिरत असल्याने लहान मुलांना तसेच स्त्रियांना रस्त्यावरून चालताना सुरक्षित वाटत नाही. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या खाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. हॉटेल परिसरात, बाजारात कुत्र्यांचा वावर अधिक असतो. कचराकुंडीतील वस्तू खाण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. कचरा कुंड्यांमधील कचरा त्यांच्याकडून अस्ताव्यस्त पसरवला जातो.‘तो’ प्रस्ताव बासनातभोसरी औद्योगिक परिसरात कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेकडून मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मात्र, त्यांची संख्या अपुरी आहे. तक्रार आलेल्या सर्वच ठिकाणी त्यांना वेळेत पोहचता येत नाही. महापालिकेची श्वानपथके सकाळी दहा ते पाच या वेळेत काम करतात. मात्र, मोजकीच कुत्री त्यांच्या हाती लागतात. पडलेली कुत्री दूर नेऊन सोडल्यानंतर काही दिवसांनी ती पुन्हा आपल्या परिसरात फिरताना दिसतात. मध्यंतरीच्या काळात कुत्रे पकडण्याचे काम ठेकेदारी पद्धतीवर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, कालांतराने तो बासनात गुंडाळला गेला.

टॅग्स :dogकुत्राpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड