शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

उधारीच्या भांडणाचा राग आल्याने तरुणाचे अपहरण करून मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 20:28 IST

टपरीवरील उधारीच्या कारणांवरून झालेल्या भांडणाच्या रागातून चार चाकीतून आलेल्या चौघांनी तरुणाचे अपहरण करून जबर मारहाण केली. तसेच अपहरण करत असताना मित्राने विरोध केला म्हणून दगड डोक्यात मारून त्यालाही जखमी केले.

हिंजवडी : टपरीवरील उधारीच्या कारणांवरून झालेल्या भांडणाच्या रागातून चार चाकीतून आलेल्या चौघांनी तरुणाचे अपहरण करून जबर मारहाण केली. तसेच अपहरण करत असताना मित्राने विरोध केला म्हणून दगड डोक्यात मारून त्यालाही जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १) दुपारी अडीचच्या सुमारास चांदणी चौक येथील बंद पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर बावधन येथे घडली. हिंजवडी पोलिसांनी चौघां विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कुणाल नारायण फाले (वय २५, रा. घोटावडे फाटा, ता. मुळशी) यांनी फिर्याद दाखल केली असून राम राजकुमार पाटील (वय २९, रा. भुकूम, ता. मुळशी), राहुल बालाजी बंडगर (वय २२, रा. भुकूम, ता. मुळशी), तौसीफ राजू इनामदार (वय २२, रा. लवळे, ता. मुळशी), प्रवीण भोसले (रा. पिरंगुट, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील चौथा आरोपी प्रवीण फरार असून इतरांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी कुणाल फाले हे त्यांचा मित्र अक्षय प्रदीप यादव व त्यांची पत्नी हे चांदणी चौकाजवळील बंद पेट्रोल पंपासमोर बोलत उभे असताना त्यांचा मित्र अक्षय विक्रम वाल्हेकर (वय २३) हा त्यांच्या जवळ येऊन थांबला. अक्षय याची आरोपी राम पाटील यांच्या मेव्हण्याशी यापूर्वी टपरीच्या उधारीवरून झाले होते. त्या भांडणाच्या रागातून चारचाकीतून आलेल्या चौघांनी अक्षय वाल्हेकर यांना जबर मारहाण केली. तसेच जबरदस्तीने चारचाकीकडे ओढत नेत असताना फिर्यादीने रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राम उर्फ अतुल पाटील याने बाजूला पडलेला दगड फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले. तसेच अक्षय वाल्हेकर यास जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून नेऊन मारहाण केली. या घटनेत तीन आरोपींना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Kidnappingअपहरणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड