शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पुणे धायरीमध्ये बलात्कार करुन चिमुकलीचा निर्घूण खून, सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 19:50 IST

धायरी येथून एका अडीच वर्षाच्या मुलीची अपहरण करून तिचा खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

पुणे - आई-वडीलांसह घरामध्ये झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुरडीचे झोपेतच अपहरण केल्यावर बलात्कार करुन तिचा गळा आवळून निर्घूण खून करण्यात आल्याची घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी साडेसहाच्या दरम्यान धायरीमध्ये घडली. सकाळी तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर घटना उघडकीस आली. या घटनेमुळे पोलिसही सुन्न झाले असून, जवळपास वीस ते २५ जणांकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरु होती. श्रृती विजय शिवगणे (वय अडीच वर्षे) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी वडील विजय शिवराज शिवगणे (वय ३२, रा. लगडमळा, वडगाव धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय शिवगणे हे मुळचे परभणी जिल्ह्यातील रहीवासी आहेत. दोन महिन्यांपुर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी ते पुण्यात आले होते. सध्या ते सिंहगड रस्त्यावरील वडगाव धायरीजवळ राहात होते. विजय हे जवळच असलेल्या समृद्धी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात. तर, आई विद्या जवळच्याच मंडईमध्ये भाज्या पॅकिंग करुन विकण्याचे काम करतात. दिवाळीनिमित्त शनिवारी त्यांच्याकडे श्रृतीचा मामा एक दिवसासाठी राहण्यास आला होता. रात्री सव्वाअकरापर्यंत सर्वजण गप्पा मारत बसलेले होते. साडे दहाच्या सुमारास विजय झोपले. त्यानंतर सव्वाअकराच्या सुमारास विद्या आणि श्रृती झोपल्या. त्यांच्या घराला लोखंडी आणि लाकडी असे दोन दरवाजे आहेत. लोखंडी दरवाजा फटीमधून हात घालून उघडता येतो. तर लाकडी दरवाजा खिडकीमधून हात घालून उघडता येतो. घरामधील सर्वजण झोपल्यानंतर हा दरवाजा उघडून घरामध्ये घुसलेल्या अज्ञात आरोपीने श्रृतीला उचलून नेले. रात्री बारा-सव्वाबाराच्या सुमारास विद्या यांना जाग आली तेव्हा श्रृती त्यांच्याजवळ नव्हती. त्यांनी पती विजय यांना उठवले. त्यांनी घरामध्ये तसेच आसपासच्या परिसरात बरीच शोधाशोध केली. मात्र, श्रृती मिळून आली नाही. या दोघांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला दुरध्वनी करुन श्रृती हरवल्याची माहिती दिली. घटनास्थळी तातडीने लगडमळ्यामध्ये दाखल झालेल्या ६० पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांनी तिचा शोध सुरु केला. रात्रभर तिचा शोध सुरु होता. दरम्यान, अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याभागातील ऊसाचे शेत, गवत उगवलेला भाग असल्याने त्यामध्येही शोध सुरु होता. पहाटे साडेसहाच्या सुमारास उजाडल्यावर काही ठिकाणी रक्ताचे डाग दिसून आले. पोलिसांनी आसपास शोध घेतला असता तिचे कपडे मिळाले. तेथून काही अंतरावरच श्रृतीचा मृतदेह आढळून आला. तिच्या गळ्याभोवती फास दिल्याचे ब्रण होते. आरोपीने गळा आवळून तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तिच्या आई-वडीलांनी व्यक्त केलेल्या संशयावरुन काही जणांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच आसपासच्या भागात काम करणारे जवळपास २५ जण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.  डॉ. निलम गो-हे यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन

अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन खून करण्यात आल्याच्या घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. निलम गो-हे यांनी ससून रुग्णालयात जाऊन मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली. यासोबतच पोलीस अधिकारी आणि डॉक्टर्सची भेट घेतली. पोलिसांना तपास जलदगतीने लावण्यासंदर्भात विनंती केली. या मुलीच्या कुटुंबीयांवर ओढवलेला प्रसंग अत्यंत दुदैर्वी असून तिच्या शवविच्छेदन अहवालावर पुढील गोष्टी अवलंबून असल्याने हा अहवाल विशेष काळजीपूर्वक तयार करण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरी भागात बीट स्तरावर महिला दक्षता व नागरिक सुरक्षा दले स्थापन करणे अत्यावश्यक आहे. या दलांच्या मदतीने दुर्गम व निर्जन भागात अधिकाधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तपासासंदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर आणि पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.