शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

खेड, जुन्नरला अवकाळीचा फटका

By admin | Updated: February 10, 2015 23:59 IST

: जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील उदापूर, डिंगोरे, मांदारणे, शिंदेवाडी, बनकरफाटा तसेच इतर वाड्या-वस्त्यांवर मुसळधार पाऊस झाला.

मढ : जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील उदापूर, डिंगोरे, मांदारणे, शिंदेवाडी, बनकरफाटा तसेच इतर वाड्या-वस्त्यांवर मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी हलक्या गाराही पडल्या. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदे, गाजर, मेथी, कोथिंबीर, घेवडा, वांगी, गहू, हरभरा तसेच विविध प्रकारच्या पालेभाज्या ही पिके आहेत. पावसामुळे कांदा व तत्सम पिकांवर डावणी, करपा, मावा या रोगांचा प्रादुुर्भाव होणार आहे. नारायणगाव परिसरात २० मिनिटे पाऊस झाला. चाकण : चाकण व परिसरात पावसाने झोडपून काढले. काही ठिकाणी लहान गारा पडल्या. खराबवाडीत पावसात चिमुकल्यांनी गारा वेचण्याचा आनंद लुटला. चाकणसह खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, महाळुंगे, खालुंब्रे, सावरदरी, शिंदे, वासुली, भांबोली, वराळे, कोरेगाव, आंबेठाण, बिरदवडी, गोनवडी, बोरदरा, पिंपरी, भाम, कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, वाकी, काळूस, रासे, भोसे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. चाकणच्या कोहिनूर सेंटरमध्ये पावसाने पाण्याचे तळे साचले होते. तब्बल अर्धा ते पाऊण तास पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काळूस : खेड तालुक्याच्या मध्यपूर्व भागात अचानक झालेल्या अवकाळी पावसाने कांदापिकाचे नुकसान केले.संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तालुक्याच्या वाकी, काळूस, खरपुडी, भोसे, शेलगाव, शेटफळ परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात घोडेगाव परीसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गारांचा पाऊस पडला. पंधरा ते विस मिनीट पडलेल्या या पावसाने सगळयांचीच धावपळ करून टाकली. कांदा, आंबा पिकांना मोठा फटका बसणार आहे. गारपीट झाल्यानंतर अनेक ठिकाणी आंब्याचा मोहर गळून पडलेला दिसत होता तर या गारपीटीमूळे कांदा वाढीला मोठा मार बसणार आहे. आधीच विविध रोगराईने चिंताग्रस्त असलेल्या बळीराजाची चिंता अधिक दृढावली आहे. (वार्ताहर)