शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

खराडीतील एटीएमवर २१ लाखांचा दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 02:07 IST

शहरामधील दरोड्याचा हा सलग दुसरा प्रकार

चंदननगर : खराडीतील एसबीआयच्या एटीएममधून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या वेळी २१ लाखांची रक्कम चोरी केल्याची घटना घडली. याबाबत, चंदननगर पोलीस ठाण्यात इराप्पा चंदप्पा मेलकेरी (वय ३०, रा. ससाणेनगर, हडपसर) या एसबीआयच्या कंत्राटदाराने फिर्याद दिली.

चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : दि.२६ रोजी रात्री १०.५२ ते दि.२७ रोजी पहाटे ०४.४३ वाजण्याच्या दरम्यान खराडीरोडवरील यशवनगर या भागातील पंचरत्न अपार्टमेंट मधील स्टेट बँक आॅफ इंडियाचे हे एटीएम चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी एटीएम मशिनचा दरवाजा गॅस कटरच्या साह्याने कापला. गॅस कटरमुळे काही २०० रुपयांच्या नोटा जळाल्या, त्या जळालेल्या नोटा तिथेच टाकल्या. या एटीएममधील २१,४९,५०० रुपयांची रक्कम चोरी करून नेली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. पी. भोसले हे करत आहेत.पिंपळे गुरव येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनची मागील बाजू गॅस कटरने कापून त्यातील कॅश बॉक्समधील ६ लाख ७५ हजार रुपये चोरुन नेण्याचा प्रकार २० फेब्रुवारी रोजी उघडकीस आला होता़ चोरट्यांनी कॅश बॉक्समधील पैसे चोरुन नेल्यावर शटर बंद केल्याने दोन दिवस हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नव्हता़