शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

 खंडेरायाच्या पालखी सोहळा, 'येळकोट, येळकोट'च्या गजरात मर्दानी दस-याचा उत्सव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 21:40 IST

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपरिक पद्दतीने ''मर्दानी दस-याचे'' आयोजन केले जाते. 15 तासांपेक्षाही जास्त काळ चालणारा जेजुरीचा दसरा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत येत असतात

जेजुरी -  महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपरिक पद्दतीने ''मर्दानी दस-याचे'' आयोजन केले जाते. 15 तासांपेक्षाही जास्त काळ चालणारा जेजुरीचा दसरा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत येत असतात. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात आणि भंडा-याच्या उधळणीत, फटाक्यांच्या आतषबाजीत  या मर्दानी दस-याला सुरुवात करण्यात आली.मल्हारी मार्तंड ! जय मल्हार ! जल्लोषाने ओथंबलेले स्वर आणि भंडार्‍याच्या मुक्त उधळणीने आसमंताला आलेले पिवळेपण! हे ठिकाण आहे उत्साह, आनंद आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणार्‍या खंडेरायाच्या जेजुरीचे, तीर्थक्षेत्र जेजुरीत धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक अशा मर्दानी दस-याला जल्लोषात सुरुवात झालेली आहे. उद्या सकाळपर्यंत म्हणजे 15 तासांपेक्षाही जास्त काळ हा मर्दानी दसरा चालणार आहे. दस-यानिमित्त जेजुरी गडावर संपूर्ण रोषणाई करण्यात आली होती. हा पालखी सोहळा रामण्याकडे सिमोल्लंघनासाठी नेण्यात आला . त्या ठिकाणी श्री. मार्तंड भैरवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सव मूर्तींना आणण्यात आले.या ठिकाणी देवभेटीचा विलोभनीय सोहळ्यानंतर पालखी सोहळा मुख्यरस्त्याने सकाळी गडावर पोहोचला आणि त्यावेळी मानाची असणारी 42 किलो वजन असणा-या तलवारीचे मर्दानी खेळ खेळण्यात आले आणि पालखी सोहल्याचा समारोप उत्साहात पार पडला.