शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

रॉकेलचे दिवे असलेली सायकल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 06:57 IST

विविध प्रकारांचा समावेश : चिमुकल्यांनी अनुभवले सायकलींचे समृद्ध भांडार

पुणे : पहिल्या महायुद्धात वापरलेली बुलेट म्हणजेच बंदुकीची सायकल, दुर्मिळ फोल्डिंग सायकल, १९१५ ची सनबीम सायकल, हॉफमन, रॉयल एनफिल्ड सायकल, रॉकेलचे दिवे असलेली सायकल अशा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या विविध देशातील विविध प्रकारच्या सायकली पाहण्याची संधी चिमुकल्यांना मिळाली. सायकलींचा समृद्ध वारसा जतन करणारे विक्रम पेंडसे यांचा सायकल संग्रह चिमुकल्यांना अनुभवता आला.बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे जागतिक संग्रहालय दिनानिमित्त विद्यार्थ्यांना सायकल संग्रहालय दाखवण्यात आले. कर्वेनगर येथील सहवास सोसायटीमध्ये सफरीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी इतिहास संशोधक प्र. के. घाणेकर, शिल्पकार विवेक खटावकर, विक्रम पेंडसे, मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा, नरेंद्र व्यास, अनिल दिवाणजी, पांडुरंग गायकवाड, कुमार रेणुसे, अप्पा वणकर, अभिषेक मारणे, सागर घम, भावेश ठक्कर, नितीन पंडित, अशोक जाधव, प्रीती वाहिले, कल्याणी जावळकर, हेमलता शाह, सारिका पाटणकर उपस्थित होते. यावेळी विक्रम पेंडसे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.२०० सायकलींचे प्रकारविक्रम पेंडसे म्हणाले, ‘सायकलींचा संग्रह करण्याच्या आधी मोटारसायकली जमवण्याचा छंद होता. परंतु, पुणे शहराची ओळख असलेल्या सायकलीकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आल्यावर आपोआप सायकलींचा संग्रह करण्याची आवड निर्माण झाली. या मधूनच २०० विविध प्रकारच्या सायकली असणारे हे संग्रहालय उभे राहिले आहे. पूर्वी वाडे होते तोपर्यंत सायकली होत्या; परंतु वाड्यांची संख्या जशी कमी झाली, तशा सायकलीदेखील कमी झाल्या.’ंस्वातंत्र्यापूर्वीच्या सायकलीसायकलचे जुने डायनामो, दुरुस्ती कीट, पूर्वी सायकलींना कर भरावा लागत असे, ते दुचाकी कर बिल्ले, कार्बाइडचे दिवे यासोबतच सायकलीचे विविध भागदेखील संग्रहालयात विद्यार्थ्यांनी पाहिले. भारतात स्वातंत्र्याच्या आधीपासून बाहेरील देशातून सायकली आणल्या जात, त्यातील अनेक सायकली अतिशय चांगल्या स्वरूपात विद्यार्थ्यांना पाहायला मिळाल्या.

टॅग्स :Puneपुणे