शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आंदोलनाला केजरीवालांचा पाठिंबा

By admin | Updated: August 6, 2015 03:15 IST

फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध

पुणे : फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी दिल्लीत जाऊन धडकलेल्या विद्यार्थ्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला आहे. एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी बुधवारी मुख्यमंत्री केजरीवालांची भेट घेतली व त्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. केजरीवाल यांनी विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि ज्या कारणासाठी ते लढत आहेत त्याचेही त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये सुरू केलेल्या आंदोलनाचा आज ५५ वा दिवस होता. राहुल गांधी यांच्या भेटीनंतर विद्यार्थ्यांमधील आंदोलनाचा उत्साह आणखी वाढला असून त्यांनी आता थेट दिल्लीमध्ये जाऊन आपल्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी आज जंतरमंतर येथे विद्यार्थी संसदेचे आयोजन केलेले होते. त्यामध्ये ३०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक सहभागी झालेले होते. बनारस विद्यापीठ, लखनौ विद्यापीठ, जेएनयूमधून हे सारे आलेले होते. इंटरनॅशनल सेंटर फॉर एथनिक स्टडीज (आयसीइएस)ने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जस्टिस प्रोजेक्ट या नावाने एक परिसंवाद आयोजिलेला आहे. त्या माध्यमातून पाच देशांशी चित्रपट व संशोधन प्रबंधातून नाते जोडले जाणार आहे. त्यास ५० हून अधिक कलाकार, चळवळीतील कार्यकर्ते, चित्रपट दिग्दर्शक व विद्यार्थी सहभागी होत आहेत. दि. ६ रोजी विहान सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून दिशा स्टुडंटस्बरोबर चर्चेचा कार्यक्रम आयोजिला आहे. एफटीआयआय विद्यार्थ्यांचे आंदोलन, त्यांची भूमिका, माजी विद्यार्थ्यांचे मनोगत अशा साऱ्या बाबींचा त्यात समावेश असणार आहे. (प्रतिनिधी)