शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

कात्रज ते नवले पूल रस्ता : सव्वाशे कोटींचा निधी अखेर मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 02:11 IST

नवले पूल ते कात्रज चौक या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या विकासासाठी नुकताच केंद्र शासनाने सुमारे सव्वाशे कोटींचा निधी मंजूर केला आहे.

नऱ्हे : नवले पूल ते कात्रज चौक या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या विकासासाठी नुकताच केंद्र शासनाने सुमारे सव्वाशे कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच हा रस्ता नुकताच राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर करण्यात आला आहे. लवकरच या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामास सुरुवात होणार आहे, त्यामुळे वाहतूककोंडीत सापडलेला रस्ता आता नागरिकांना वाहतुकीसाठी सुखकर ठरणार आहे.नवले पूल ते कात्रज या महामार्गालगत अनेक मंगल कार्यालये असून लग्नसराईच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्याजवळच शाळा, महाविद्यालय असल्याने विद्यार्थी, पालक, स्कूलबस आदी या महामार्गाचाच वापर करत असल्याने वारंवार वाहतूककोंडी होते. परंतु वाहतूक पोलिसांकडे यावर ठोस उपाययोजना नाही.सध्याचा रस्ता हा चारपदरी असून तो सहापदरी होणार आहे. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस दुपदरी सेवा रस्ता होणार आहे. मुख्य रस्ता व सेवा रस्ता यामध्ये दोन मीटरची भिंतही बांधली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यावर कोणताही अडथळा न येता होणारी वाहतूककोंडी कमी होईल. तसेच सेवा रस्ता झाल्यानंतर स्कूलसाठी येणारे विद्यार्थी स्कूलबस व पालक हे सेवा रस्त्याचा उपयोग करतील. तसेच येथे पेट्रोल पंपही असल्याने येथे पेट्रोल भरावयास आलेल्या गाड्या या उलट्या दिशेने परत जातात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. मात्र सेवा रस्ता झाल्यास नागरिकांना पेट्रोल भरल्यानंतर उलट्या दिशेने जाण्याची गरज भासणार नाही, परिणामी होणारे अपघात टळतील.सिंहगड रस्ता व सातारा रस्ता या प्रमुख मार्गाला जोडणारा, तसेच नवीन मुंबई-बेंगलोर महामार्गास मिळणारा उपनगरातील महत्त्वाचे बाह्यवळण मार्ग म्हणजे नवले पूल ते कात्रज रस्ता सध्या हा रस्ता वाहतूककोंडी, अवैध पार्किंग, बेशिस्त वाहतूक प्रवासी वाहतूक, खराब रस्ते आदी कारणामुळे धोकादायक बनलेला आहे. येथे रोज दोन-तीन अपघात घडतच असतात. मात्र प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र आता सेवा रस्ता झाल्यास वाहतूक सेवा सुरळीत होईल, असे जाणकारांचे मत आहे. सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माहितीनुसार, नवले पूल ते कात्रज चौक या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने सुमारे सव्वाशे कोटींचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची सुरुवात होणार आहे.नवले पूल ते कात्रज मार्गासाठी सव्वाशे कोटीचा निधी मंजुरीसाठी मी स्वत: आमदार भीमराव तापकीर, खासदार अनिल शिरोळे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला आहे.- अरुण राजवाडे, अध्यक्ष, भाजपा खडकवासला मतदारसंघसव्वाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून निविदा प्रक्रियेचे काम लवकर व्हावे, तसेच प्रत्यक्षात काम लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न करीत आहे.- भीमराव तापकीर, आमदार खडकवासला मतदारसंघनवले पूल ते कात्रज रस्ता ह्या महामार्गासाठी निधी मंजूर झाला असून मात्र अजून निविदा प्रक्रिया करणे बाकी आहे. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.- गणेश चौरे, कार्यकारी अभियंता महामार्गालगत असणारी अतिक्रमणे व वाहतूककोंडीमुळे आम्हा नागरिकांना प्रचंड मन:स्ताप होत असून शासनाने यावर लवकर कार्यवाही करावी. - चंद्रकांत कुंभार, नागरिक

टॅग्स :Puneपुणे