पुणे : येथील कलापद्म संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच जवाहरलाल नेहरू आॅडिटोरिअमध्ये पार पडला. संस्थेच्या सहकारनगर, वारजे, कर्वेनगर, हडपसर शाखेतील सुमारे ६० विद्यार्थिनींनी हा कथक नृत्याचा कार्यक्रम सादर केला. भातखंडे व खैरागड विद्यापीठाच्या उपकुलगुरू गुरुश्री पौर्णिमा पांड्ये (लखनौ), गुरू सुजाता नातू, जयश्री जंगम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी भालचंद्र पालकर, जयवंत देवरूखकर, हेमंत नेवरेकर हेही उपस्थित होते.सुरुवात संस्थेच्या संस्थापिका कांचन पालकर यांच्या नृत्याने झाली. त्यानंतर आर्यन व ईशान या चार वर्षीय चिमुरड्यांनी ‘वक्रतुंड’ या गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले. उत्तरार्धात कालिदासांच्या ऋतुसंहाराचे अंतरंग उलगडणाऱ्या ‘ऋतुरंग’ या नृत्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. पूर्वार्धात श्रीपाद पोरे (तबला), विजय देशमुख (हार्मोनिअम), ज्योती एकबोटे (गायन), संजय केसकर (बासरी), उत्तरार्धात तुषार चटर्जी, मंजूषा आगे, स्वप्नील परांजपे, प्रसाद सुंदर (तबला), करण पाटील (पखवाज) यांची सुरेख साथ लाभली. कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत कदम यांचे होते. कार्यक्रमाला नीला मिरज, बंगलोरच्या वि. भा. रामास्वामी यांची विशेष उपस्थिती होती.(प्रतिनिधी)
रंगला कथकचा नयनमनोहारी सोहळा!
By admin | Updated: February 7, 2017 03:16 IST