कथक, भरतनाट्यम् जुगलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2016 01:05 AM2016-03-14T01:05:45+5:302016-03-14T01:05:45+5:30

कथक आणि भरतनाट्यम या नृत्यशैलींची जुगलबंदी आणि त्याला लाभलेली उत्तम संगीताची साथ असा माहोल रसिकांनी अनुभवला.

Kathak, Bharatanatyam Jugalbandi | कथक, भरतनाट्यम् जुगलबंदी

कथक, भरतनाट्यम् जुगलबंदी

Next

पुणे : कथक आणि भरतनाट्यम या नृत्यशैलींची जुगलबंदी आणि त्याला लाभलेली उत्तम संगीताची साथ असा माहोल रसिकांनी अनुभवला. कल्पक संगीत साधना प्रस्तुत संगीत रजनी या कार्यक्रमाचे आयोजन अण्णा भाऊ साठे सभागृहात करण्यात आले होते. नवोदित कलाकारांनी अतिशय उत्तमरित्याहा कार्यक्रम सादर केला.
नेहा सुतार आणि मयुरी जोशी यांनी कथक आणि भरतनाट्यमची जुगलबंदी सादर केली. प्रद्युम बापट यांनी संस्कृतमध्ये रामायण सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. या वेळी नल्ला याने सादर केलेल्या बासरीच्या सुरांत रसिक न्हाहून निघाले. ‘अशी पाखरे येती’ या अक्षय आठवले याने गायलेल्या गाण्यावर हर्षद देवधरने रंगमचवर पाडगावकरांचे चित्र काढत कार्यक्रमात रंगत आली.
अतुल जोशीने सादर केलेल्या ‘जडला रोग तिचा’ या स्वरचित प्रेमगीताने एक वेगळीच रंगत आणली. ईशा निंबाळकर, नेहा सुतार आणि त्यांच्या चमूने सादर केलेल्या लावणी, लोकनृत्य, कोळिगीत, बेली, आयटम नंबर असे नृत्यप्रकार सादर केले. सोमनाथ जावळे (सतार), प्रणव फणसे (बासरी), विक्रांत चनाळे (तबला) यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन मयुरी जोशी, राहुल भागवत यांनी केले. संकल्पना स्वप्ना दुर्वे यांची होती. (प्रतिनिधी)

Web Title: Kathak, Bharatanatyam Jugalbandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.