शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक वद्य अष्टमिला हैबतबाबांचे पायरीपुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:08 IST

आळंदी : मर्यादित वारकऱ्यांच्या हातातील टाळ - मृदंगाच्या निनादात आणि दोन पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात मंगळवारी (दि.८) सकाळी नऊला मंदिराच्या मुख्य ...

आळंदी : मर्यादित वारकऱ्यांच्या हातातील टाळ - मृदंगाच्या निनादात आणि दोन पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात मंगळवारी (दि.८) सकाळी नऊला मंदिराच्या मुख्य महाद्वारातील गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने माऊलींच्या ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या कार्तिकी वारी सोहळ्याला शासनाने विविध अटी - शर्ती घालून परवानगी दिली आहे. त्यामुळे मंदिरातील दैनंदिन धार्मिक तसेच परंपरेचे कार्यक्रम नियमावलींना अधीन राहून संपन्न होत आहेत.

माऊलींच्या मंदिर महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमाला सकाळी ९ वाजता भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली. सकाळी नऊच्या सुमारास माउलींच्या समाधी मंदिरापुढील महाद्वार चौकात गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमास भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. माऊलींचे पुजारी श्रीनिवास कुलकर्णी व अमोल गांधी यांनी विधिवत पौराहित्य केले. गुरू हैबतबाबांच्या पायरीला दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराचे शिंपण, हारतुरे, पेढे अर्पण करत पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार, राजाभाऊ पवार आणि कुटूंबियांच्या हस्ते पूजन करण्यात आले. महाद्वारातील विधिवत पूजेनंतर माऊलींची आरती आणि पसायदान घेण्यात आले. त्यांनतर मंदिराला प्रदक्षिणा घालून माऊली मंदीरातील गुरू हैबतबाबांच्या ओवरीत आरती घेण्यात आली. याप्रसंगी प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त ॲड. विकास ढगे, योगेश देसाई, वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, रामभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार, डी.डी. भोसले, राहुल चिताळकर, अजित वडगावकर, माऊली गुळूजकर, बाळासाहेब कुर्‍हाडे, दिनेश कुर्‍हाडे, योगेश आरु, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते.

सायंकाळी योगिराज ठाकूर आणि सायंकाळी ९ ते ११ बाबासाहेब आजरेकर यांची किर्तन सेवा झाली. गुरू हैबतबाबा पायरीसमोर रात्री १० ते पहाटे ४ पर्यंत वासकर महाराज, मारुती महाराज कराडकर आणि हैबतबाबा आरफाळकर यांच्या वतीने जागर पार पडला. हैबतबाबा वंशज्यांच्या वतीने विश्वस्त मंडळ आणि माऊलींच्या मानकऱ्यांना नारळप्रसाद देण्यात आला. दरम्यान आळंदी शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्याने मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

* पहाटे विधिवत दुधारती व महापूजा

* महाद्वारात आकर्षक फुलांची सजावट.

* श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, श्री. गुरु हैबतबाबा यांच्या आकर्षक फुलांनी सजवल्या प्रतिमा.

* मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत हरिनामाचा गजर

फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याची गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सुरुवात पालखी मालक, देवस्थानचे विश्वस्त व मान्यवर. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)

२) गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजन कार्यक्रमानंतर मंदिर प्रदक्षिणा घालताना वारकरी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)