शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

करंजविहीरेला आले ‘शासन आपल्या दारी’

By admin | Updated: March 28, 2017 23:51 IST

शासनाच्या विविध विभागांना एका छताखाली आणून त्यांच्यात समन्वय निर्माण करणे अतिशय अवघड बाब असते, तरीदेखील

आंबेठाण : शासनाच्या विविध विभागांना एका छताखाली आणून त्यांच्यात समन्वय निर्माण करणे अतिशय अवघड बाब असते, तरीदेखील नागरिकांना विनात्रास विविध दाखले किंवा अन्य कागदपत्रे जागेवर मिळावीत, यासाठी खेड तहसीलने ६ शिबिरांत जवळपास ३२ हजार नागरिकांना लाभ दिला आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार रजा राखीवच्या उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी करंजविहीरे (ता. खेड) काढले.शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत महसूल विभागाच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या विस्तारित समाधान योजनेच्या शिबिराच्या कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.याप्रसंगी रजा राखीवच्या उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह, खेडचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, तहसीलदार सुनील जोशी, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, मंदा शिंदे, धोंडाबाई खंडागळे, रोहिदास गडदे, महसूल नायब तहसीलदार बी. बी. बोडके, नायब तहसीलदार राजेंद्र जाधव, सहायक निबंधक हर्षित तावरे, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक सूरज कावळे, रामदास भोईर, संजय रौंधळ, नवनाथ दरेकर, करंजविहीरे गावचे सरपंच गणपत कोळेकर, उपसरपंच कैलास बोऱ्हाडे, नीलेश घोडके, पाईटचे मंडलाधिकारी एच. ए. सोनावणे, बी. आर. जाधव, एस. एस. आमोलिक, के. एस. मगर, एम. एच. राऊत, बी. एस. राठोड यांच्यासह तालुक्याच्या पश्चिम भागातील मान्यवर उपस्थित होते.या वेळी महसूल विभागाच्या वतीने एकूण १४ प्रकारचे लाभ देण्यात आले. यात डोंगरी विभागाचे ५७२ दाखले, डोमिसाईलचे ४६५ दाखले, शेतकरी असल्याचे ३१६ दाखले, जातीचे ८६ दाखले, जुन्या काळातील परंतु सध्या अस्तित्वात नाहीत, अशा सोसायटीचा बोजा कमी करून इतर अधिकारामधील बोजा करण्याचा फायदा ३५३ शेतकऱ्यांना, कुळकायदा कलम ४३ कमी करण्याचा फायदा ३२ शेतकऱ्यांना, संजय गांधी योजनेचे धनादेश वाटप ९ लाभार्थ्यांना, संजय गांधी लाभ मंजूर आदेश ३ लाभार्थ्यांना, रेशनकार्डवाटप १३०८ नागरिकांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी सुनील गाढे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील, रोहिदास गडदे, पांडुरंग मरगज यांनी विचार व्यक्त केले.तहसीलदार सुनील जोशी यांनी प्रास्ताविक केले. संजय कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले. सोसायटी संचालक रघुनाथ शिवेकर यांनी आभार मानले.सहकार विभागाच्या वतीने ९७४ शेतकऱ्यांना भागदाखला वाटप, २२० शेतकऱ्यांना रूपे कार्ड वाटप, तर आसखेड खुर्द येथील ३१९ शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारामधील चुकलेली नावे दुरुस्त करून देण्यात आली. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या वतीने ५० पिशव्या बियाणेवाटप करण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने ८० लोकांची तपासणी करण्यात आली. महिला बचत गटाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर १०० कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.