शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

कनेरसरच्या पुलाला भगदाड; वाहतुकीस धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:45 IST

कनेरसर गावात जाणाऱ्या रस्त्याच्या पुलाचा भराव खचला असून, पुलाच्या बांधकामाचे दगड निखळले आहेत, त्यामुळे पूल धोकादायक झाला आहे.

दावडी : कनेरसर गावात जाणाऱ्या रस्त्याच्या पुलाचा भराव खचला असून, पुलाच्या बांधकामाचे दगड निखळले आहेत, त्यामुळे पूल धोकादायक झाला आहे.पुलाला मोठमोठे भगदाड पडले असून, या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी कनेरसरचे माजी सरपंच जवाहर दौंडकर, काळुराम दौंडकर यांनी केली आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर व शिरूर तालुक्यातील केंदूर व परिसरातील गावांना जोडणारा कनेरसर-केंदूर हा जवळचा रस्ता आहे. तसेच हा रस्ता कनेरसर गावात जातो. गावात ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, आरोग्य उपकेंद्र व मोठी लोकवस्ती असल्याने या पुलाचा उपयोग होत असून, या ठिकाणी नेहमीच वाहनांची व नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांची या पुलावरून ये-जा सुरु असते. कनेरसर येथे सेझ प्रकल्प असल्याने हा रस्ता नेहमीच वर्दळीचा बनला आहे. ओढ्यावर जुना दगडी पूल आहे. या पुलावरून या परिसरात कंपन्यांच्या कच्च्या मालाची वाहतूक याच रस्त्याने सुरु असते. पुणे, वाघोली, कोरेगाव भीमा येथे जाण्या-येण्यासाठी केंदूर-कनेरसर हा जवळचा रास्ता आहे,काही महिन्यांपूर्वी पुलाच्या बांधकामाचे दगड निखळले होते, त्यामुळे हा पूल वाहतुकीला धोकादायक झाला होता. याबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलाच्या दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकPuneपुणे