शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला ‘मेट्रो’ला हवे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 04:11 IST

खडकवासला ते स्वारगेट या मेट्रो मार्गाबद्दल महामेट्रो कंपनी सकारात्मक असून, त्यासाठी महापालिकेने आमच्याकडे प्रस्ताव पाठवावा, अशी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका आहे.

खडकवासला ते स्वारगेट या मेट्रो मार्गाबद्दल महामेट्रो कंपनी सकारात्मक असून, त्यासाठी महापालिकेने आमच्याकडे प्रस्ताव पाठवावा, अशी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका आहे. उड्डाणपुलापेक्षा हा पर्याय चांगला असून, महापालिकेने त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे या भागातील बहुसंख्य नगरसेवकांचे मत आहे. महापालिका प्रशासनाने मात्र त्याबाबत अजून काही हालचाल सुरू केलेली दिसत नाही. त्यांचे दुर्लक्ष होत असले तर महापालिका पदाधिकाºयांनी ही मागणी लावून धरली पाहिजे. महापालिकेने तिथे उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. मात्र सातारा रस्ता व हडपसर, पुणे विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय येथील उड्डाणपुलांचा अनुभव पाहिला तर ते वाहतूककोंडी टाळण्यासाठी फारसे उपयोगी पडत नाही असेच दिसते आहे. त्यामुळेच सिंहगड रस्त्यावरचा हा नियोजित उड्डाणपूल रद्द करून महापालिकेने तिथे मेट्रो मार्गासाठी प्रयत्न करायला हवा आहे.मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांचे काम सध्या सुरू आहे. ते सुरू झाले त्याच वेळी मेट्रोच्या आणखी काही विस्तारीत मार्गांची मागणी सुरू झाली. त्यापैकी पिंपरी-चिंचवडपासून पुढे निगडीपर्यंत व स्वारगेटपासून पुढे कात्रजपर्यंत या दोन मार्गांना तत्त्वत: मान्यताही मिळाली असून, त्याच्या सर्वेक्षणाचे कामही महामेट्रोने सुरू केले आहे. स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालाचा सर्व खर्च पुणे महापालिका देणार आहे. तसाच पुढाकार आता महापालिकेने खडकवासला ते स्वारगेट या मार्गाबाबतही घेणे गरजेचे आहे.सिंहगड रस्त्यापासून पुढे थेट महापालिका हद्द संपेपर्यंत एकूण ४ प्रभागांतील प्रत्येकी चार याप्रमाणे १६ नगरसेवकांपैकी तब्बल १५ नगरसेवक महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे आहेत. फक्त एक महिला नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या असून त्यांचाही मेट्रोच्या मागणीला पाठिंबा आहे. भाजपाच्याच नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी महापौर, आयुक्त यांना निवेदन देऊन यात लक्ष देण्याची मागणी केली आहे. सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन एक दबाव गट तयार केला तर महापालिका पदाधिकारी व प्रशासन यांना याकडे लक्ष दिल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या सल्ल्याने महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी एक लाख नागरिकांच्या स्वाक्षºयांची मोहीम यासाठी सुरू केली आहे.गेल्या काही वर्षांत पुण्याच्या उपनगरांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वसाहती झाल्या आहेत. सिंहगड रस्त्यापासून पुढे खडकवासल्यापर्यंतचा परिसर त्यात अग्रभागी आहे. २० लाखांपेक्षाही जास्त नागरिक या परिसरात राहत असतील. त्यांच्यापैकी काही लाख लोक रोज पुण्यात येत व जात असतात. त्यात नोकरदार महिलांचाही समावेश आहे. जीव मुठीत धरून त्या रोज या मृत्यूच्या सापळ्यातून ये-जा करत असतात. सिंहगड रस्त्यावरच्या वाहतुकीची सकाळी९ ते ११ व सायंकाळी ५ ते ८ या वेळात पाहणी केली तर याचा अंदाज येईल. वाहने इतकी वाढली आहेत की कितीही मोठा केला तरी रस्ता अरुंदच वाटेल अशी स्थिती आहे.भविष्यात पुण्याच्या लोकसंख्येत व वाहनांमध्येही आणखी वाढच होणार आहे. मध्यभागात आता जागाच शिल्लक नाहीत. त्यामुळे उपनगरांमध्येच निवासी वसाहती वाढणार व त्यांना कामासाठी रोज शहरात यावे लागणार. सिंहगड रस्ता त्याला अपवाद नाही. त्यामुळे आताच त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. मेट्रोसारखी सार्वजनिक सुविधा मिळाली तर रस्त्यावर येणाºया वाहनांच्या संख्येत नक्कीच घट होईल. अपघात कमी होतील. महिला, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना सुरक्षित प्रवास करता येईल. त्यामुळे या नव्या मेट्रो मार्गासाठी सर्वांनीच प्रयत्नशीलझाले पाहिजे.- राजू इनामदार