शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

कबड्डीला राजाश्रय मिळण्याची गरज : माने

By admin | Updated: January 12, 2017 01:53 IST

महाराष्ट्राची शान असणाऱ्या कबड्डी सारख्या मैदानी खेळास राजाश्रय मिळण्यासाठी निश्चित, शाश्वत प्रयत्न होणे आवश्यक आहे

इंदापूर : महाराष्ट्राची शान असणाऱ्या कबड्डी सारख्या मैदानी खेळास राजाश्रय मिळण्यासाठी निश्चित, शाश्वत प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत सोनाई उद्योग समुहाचे संचालक प्रवीण माने यांनी केले.शिरसोडी येथे भरवण्यात आलेल्या स्व. विकास चषक भव्य खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. स्व.विकास पोळ व स्व.लखन शिंदे यांच्या द्वितीय स्मृतीदिना निमित्त शिरसोडी येथील साई कबड्डी क्लब,अशोक चोरमले मित्र परिवार व शिरसोडीच्या ग्रामस्थांनी स्पर्धा भरविली होती.या स्पर्धेत छत्रपती कडलास या संघाने प्रथम क्रमांकाचे २१ हजार १ रुपयाचे पारितोषिक मिळवले. द्वितीय क्रमांक डोलेर्वाडीच्या सेव्हनस्टार संघाने मिळवला. तर मुंबईच्या मातृछाया संघाने तृतीय क्रमांक मिळवला. शरद झोळ, सिकंदर देशमुख, बापू घोगरे, शब्बीर पठाण, अशोक पवार यांनी पंच म्हणून काम पाहिले. गुण लेखक म्हणून राघु शिंदे, शंकर चोरमले यांनी काम पाहिले. किसन शिंदे, रामभाऊ देवकर,सुरेश हाके, आप्पासाहेब चोरमले,मयुर गटकुळ,अशोक चोरमले, सोमनाथ ठवरे,अमीर शेख, प्रकाश शिंदे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. प्रो कबड्डी लीगमध्ये यु मुंबा संघातून खेळणारा ओंकार जाधव,महा कबड्डी लीगमध्ये मुंबई डेविल्स संघाकडून खेळणारा सुदेश कुळ्ये, पुणे पँथर्स संघाकडून खेळणारा नितीश मोरे,मुंबई डेवील्स संघाकडून खेळणारा संकेत सावंत, पुणे ग्रामीण पोलीस दलातील निलेश केमदाणे हे खेळाडु या स्पधेर्साठी आले होते. मातृछाया मुंबई संघाचा स्वप्नील घाग, छत्रपती कडलस संघाचा ज्ञानेश्वर जाधव, इंदापूरच्या लखन पंडीत यांनी चमकदार खेळ केला. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे २१ हजार १ रुपयांचे पारितोषिक रोख सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने यांनी दिले. द्वितीय ११ हजार १ रुपयांचे पारितोषिक पिंपरी खुर्द शिरसोडीचे माजी सरपंच नानासाहेब नरुटे यांनी तर तृतीय ७००१ रुपयांचे पारितोषिक विशाल मारकड यांनी दिले होते.