शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

बस देखभालीचे काम आता रात्रीच

By admin | Updated: April 15, 2017 04:11 IST

महानगर परिवहन मंडळाकडील (पीएमपी) बसची देखभाल व दुरुस्तीची (मेंटेनन्स) बहुतांश कामे रात्रीच होण्यासाठी वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ड्युट्यांमध्ये

पुणे : महानगर परिवहन मंडळाकडील (पीएमपी) बसची देखभाल व दुरुस्तीची (मेंटेनन्स) बहुतांश कामे रात्रीच होण्यासाठी वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ड्युट्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. ६० टक्के कर्मचाऱ्यांनी रात्रपाळी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिवसा दुरुस्तीसाठी बस बंद ठेवल्या जाणार नाहीत. पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी पीएमपी प्रशासनात बदल करण्याचा धडाका लावला आहे. कर्मचाऱ्यांच्या ड्युटीच्या वेळेत बदल, कामचुकारांना निलंबित करण्यात आले. शुक्रवारी वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.बसच्या देखभाल-दुरुस्तीचे जास्तीत जास्त काम रात्रीच्या वेळी पार पडावे, असे नियोजन करण्यात आले आहे. वर्कशॉपमधील एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६० टक्के कर्मचाऱ्यांना रात्री १० ते सकाळी ६ अशी ड्युटी लावण्यात आली आहे. सकाळी ६ ते दुपारी अडीच या वेळेत २० टक्के व दुपारी २ ते रात्री साडेदहा या वेळेत २० टक्के कर्मचारी सेवा बजावतील. शिफ्टचा कालावधी हा १५ दिवसांचा असेल. बसची सर्व्हिसिंग करण्याची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ ही निश्चित करण्यात आली आहे. सकाळी व दुपारच्या वेळी केवळ रनिंग मेंटेनन्सची कामे केली जातील. इतर सर्व देखभाल-दुरुस्तीची कामे ही रात्रीच्या वेळेत होतील. प्रत्येक शिफ्टमध्ये जेवणाची वेळ ४ तासांनंतर अर्ध्या तासाची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर रात्रपाळीसाठी दोन सुपरवायझर नेमले जाणार आहेत.(प्रतिनिधी)ते १७४ कर्मचारी अखेर पीएमपीत रुजूपीएमपीच्या सेवेत असलेले; मात्र अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत कार्यरत असलेल्या १७८ कर्मचाऱ्यांपैकी १७४ कर्मचारी अखेर पीएमपीच्या डेपो, वर्कशॉपमध्ये रुजू झाले आहेत. मात्र, रुजू झाल्यानंतर त्यातील काही जण रजेवर गेले आहेत, तर ४ जण अद्याप रुजूच झाले नाहीत. त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून, निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.बालेवाडी आगारात १३ कर्मचारी, प्रशासन विभागात ६, स्वारगेट आगार ५, कात्रज २०, निगडी ३, पिंपरी ५, मार्केट यार्ड ९, मध्यवर्ती यंत्रशाळा स्वारगेट ३०, हडपसर २२, कोथरूड १५, स्वारगेट १८, न.ता. वाडी ७, पुणे स्टेशन ११, भोसरी २, निगडी यंत्रशाळा १२ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आले आहेत.बसवाटपाचे अडीच महिन्यांचे शेड्युल्ड तयारचालक व वाहकांना कोणती बस द्यायची, याबाबतचे पुढील अडीच महिन्यांचे शेड्युल्ड निश्चित करण्यात आले आहे. चालक व वाहकांना चांगली बस उपलब्ध करून देण्यासाठी लाच घेतली जात असल्याने त्यावर हा उपाय काढण्यात आला आहे. पीएमपीच्या ताफ्यामध्ये काही चांगल्या, तर काही दुरवस्था झालेल्या बस आहेत. टाइमकीपर आणि गॅरेजकीपर यांच्याकडून चांगल्या बससाठी पैसे घेतले जात होते.