शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर पर्यटनाचा आराखडा तज्ज्ञ समितीकडून करावा, शुभंकर म्हणून बिबट्या किंवा शेकरुचा उपयोग करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 03:00 IST

राज्य शासनाच्यावतीने तालुक्याला पर्यटनाला विशेष दर्जा दिल्यानंतर स्वैर पर्यटनामुळे भविष्यातील धोके ओळखून सविस्तर विकास आराखडा बनविताना विशेष काळजी घेण्यात यावी. यासाठी तालुक्यातील पश्चिम घाटातील जैवविधतेतच्या संवदेनशील क्षेत्रांच्या निश्चितीबरोबरशुभंकर म्हणून बिबट्या किंवा शेकरूचा उपयोग करावा.

जुन्नर - राज्य शासनाच्यावतीने तालुक्याला पर्यटनाला विशेष दर्जा दिल्यानंतर स्वैर पर्यटनामुळे भविष्यातील धोके ओळखून सविस्तर विकास आराखडा बनविताना विशेष काळजी घेण्यात यावी. यासाठी तालुक्यातील पश्चिम घाटातील जैवविधतेतच्या संवदेनशील क्षेत्रांच्या निश्चितीबरोबरशुभंकर म्हणून बिबट्या किंवा शेकरूचा उपयोग करावा. तर आराखडा बनिवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशी मागणी सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक आणि पर्यटन विकास महामंडळाकडे केली आहे.याबाबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री म्हणाले, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पारंपरिक थंड हवेची पर्यटनस्थळे ठिकाणे असणाऱ्या महाबळेश्वर आणि माथेरान या स्थळांवरील गर्दीमुळे जुन्नर तालुका या पर्यटन स्थळांना समर्थ आणि सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहे. यामुळे पर्यटकांचा ओघ वाढत असून, पर्यटकांच्या वाढत्या संख्येच्या नियोजनाअभावी भविष्य पर्यावरणाबरोबच अनेक धोक्यांचा संभव आहे.यामुळे सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी तज्ज्ञांची समितीद्वारे करण्यात यावा. तालुक्यातील पश्चिम घाट परिसर हा जैवविविधतेचा समृद्ध आणि संवेदनशील भाग आहे.याभागामध्ये कासपठारावरील स्वैर पर्यटनामुळे निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी याक्षेत्रांची निश्चिती करून, या परिसरातील किमान पाच किलोमीटर परिघात पर्यटकांच्या वाहनांना प्रवेशबंदी असावी. याबाबतची मागणी आम्ही यापूर्वीच केली असून, याला गती देण्यात यावी, असे कळविले आहे.काही महत्त्वाच्या मागण्याअशा ठिकाणी जाण्यासाठी माथेरानच्या धर्तीवर घोडे, घोडागाडी, बग्गी, बैलगाड्यांचा वापर करावा. यामाध्यमातून स्थानिकांसाठीदेखील रोजगारनिर्मिती होईल.तालुक्यात धरणांची श्रृखंला असून या धरणांमध्ये जलक्रीडा आणि सी प्लेनसारख्या सेवा सुरू करण्यात याव्यात.तालुक्यातील मोठा भूभाग हा डोंगरी असून, विविध घाटरस्ते आणि विविध किल्ल्यांचा समावेश आहे. त्यांच्या विकासाबरोबर साहसी क्रीडा प्रकारांना चालना देणारी केंद्रे स्थापन करावीत.डोंगरी भागामुळे अपघातांचा धोका लक्षात घेता आपत्कालीन यंत्रणा उभारावी.डेक्कन कॉलेजच्या विविध उत्खननामधून इसवीसन पूर्व काळातील तालुक्याचा इतिहास समोर आला आहे. कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांची तालुक्याबाबत विशेष आस्था असून, त्यांनी विविध व्याख्यानांमधून तालुक्याच्या पर्यटन विकासावर माहिती सादर केली आहे. त्यामुळे तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. तर शिवनेरी किल्ला विकासाच्या माध्यमातून तालुक्यातील निसर्ग पर्यटनाची मुहूर्तमेढ रोवणारे तत्कालीन उपवनसंरक्षकअशोककुमार खडसे यांची समितीवर निवड करावी.- संजय खत्रीसह्याद्री गिरीभ्रमण संस्था

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणे