शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

जुन्नर-नाणेघाट मार्गाची दुरवस्था

By admin | Updated: July 9, 2015 23:33 IST

जुन्नर-नाणेघाट या नवीन रस्त्याची एका वर्षातच दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामात गैरप्रकार झाल्याने कामाची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

नारायणगाव : जुन्नर-नाणेघाट या नवीन रस्त्याची एका वर्षातच दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामात गैरप्रकार झाल्याने कामाची चौकशी करावी व संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी; अन्यथा घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर चौकशी समिती नेमून त्यांच्यावर एका महिन्याच्या आत कडक कारवाई करावी व रस्ता तातडीने दुरुस्त करावा़; अन्यथा पुण्यातील सिंचन भवन येथे अधिकारी व ठेकेदार यांच्या भ्रष्टाचाराविरुद्घ घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे रस्ते साधन-सुविधा आस्थापनाचे तालुकाध्यक्ष गणेश शेळके यांच्यासह उपाध्यक्ष सचिन बढे, रमेश पाटोळे, विभागप्रमुख सतीश पाटे, आशिष वाजगे यांनी दिला आहे़ जुन्नर तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यात पुरातन काळाची साक्ष देणारा नाणेघाट आहे़ या ठिकाणी पर्यटकांची सदैव वर्दळ असते़ जुन्नर-घाटघर-नाणेघाट मार्गावर चावंड, हडसर व जीवधन या किल्ल्यांकडे जाणारा मार्ग आहे़ या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम याच वर्षी पूर्ण झाले असून, उर्वरित घाटघर-नाणेघाट रस्त्याचे काम सुरू आहे़ परंतु, पहिल्याच पावसात रस्ता ठिकठिकाणी वाहून गेला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून रस्ता खचला आहे़ तसेच साईटपट्ट्यादेखील निकृष्ट पद्धतीने भरल्या गेलेल्या आहेत. १२ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांत मिळून आस़ आऱ. प्रोग्रॅम, आदिवासी बजेट या माध्यमांतून पूर्ण झाले असून त्यावर २ ते ४ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे़