पुणे : लाखोंच्या संख्येने आलेल्या पुण्यातील मराठा क्रांती मोर्चामध्ये एक महिला आपल्या पाठीशी दीड वर्षाच्या चिमुकल्याला बांधून सहभागी झाली होती. पुण्यातील एका नामांकित संस्थेमध्ये शास्त्रज्ञपदावर कार्यरत असलेल्या या महिला अधिकारी आपले पद, प्रतिष्ठा सर्व बाजूला ठेवून आपल्या लहानग्याला सोबत घेऊन या मोर्चात सहभागी झाल्या. चिमुकल्याच्या भविष्यासाठीच आपण या मोर्चात सहभागी झाल्याने त्यालादेखील या मोर्चात आवर्जून घेऊन आल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.दीपिका अभयसिंह जगताप (रा. नवी सांगवी) असे त्या महिला संशोधकांचे नाव आहे. त्या दीड वर्षाचा मुलगा, अधिराज, पती, सासू, दिर व जाऊ अशा सहकुटुंब सहभागी झाल्या होत्या. याबाबत बोलताना दीपिका जगताप म्हणाल्या, ‘‘माझ्या लहान मुलाच्या भविष्यासाठीच मी या मोर्चात सहभागी झाले. मराठ्यांना आरक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे. कोपर्डीमध्ये घडलेली घटना खूपच वेदनादायी आहे. त्यातील आरोपींना लगेच फाशी दिली पाहिजे.’’
चिमुकल्यासह झाशीची राणी मोर्चात
By admin | Updated: September 26, 2016 01:22 IST