शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

येळकोट येळकोट जय मल्हार! पहाटेपासून जेजुरीगड भाविकांसाठी खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 09:59 IST

Jejuri : कोविड महामारीमुळे राज्यभरातील धार्मिक स्थळे, मंदिरे देव दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. गेली आठ महिने मंदिरे बंद होती.

पुरंदर -  कोविडमुळे गेल्या आठ महिन्यापासून  महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीचा खंडोबा गड भाविकांसाठी बंद करण्यात आला होता. आजपासून राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार जेजुरीगड भाविकांसाठी देव दर्शनासाठी खुले करण्यात आला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करीतच भाविकांना देव दर्शन घ्यावे लागणार असल्याचे मुख्य विश्वस्त प्रसाद शिंदे यांनी सांगितले. पहाटे साडे पाच वाजता पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सपत्नीक कुलदैवत खंडोबाची महापूजा करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. 

कोविड महामारीमुळे राज्यभरातील धार्मिक स्थळे, मंदिरे देव दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. गेली आठ महिने मंदिरे बंद होती. मंदिरे खुली करावी अशी भाविकांची मागणी होती. यावर काही राजकीय पक्षानेही आंदोलने केली होती. मात्र कोविड सदृश्य परिस्थितीमुळे शासनाने मंदिरे उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकला होता. मात्र दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर  ज्या ठिकाणी कोविड ची परिस्थिती आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे अशाच ठिकाणची मंदिरे देवदर्शनासाठी शासनाने खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जेजुरीचे खंडोबा मंदिर आजपासून उघडण्यात येत आहे. 

महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने राज्यभरातून देवदर्शनासाठी येथे भाविक येणार असल्याने मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देव संस्थान वर मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. जेजुरीतील कोविड रुग्ण संख्येला आळा घालण्यात येथील प्रशासनाला जरी यश आलेले असले तरी येथे येणाऱ्या भाविकांमुळे भविष्यात साथ पसरू नये म्हणून उपाययोजना कराव्या लागणार आहेत. येथे देव दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी  शासकीय नियम व अटींचे पालन करूनच  देव दर्शनाला यावे असे आवाहन मार्तंड देव संस्थान कडून करण्यात आले आहे.  यात १० वर्षाखालील मुलांना व ६५ वर्षांवरील भाविकांना  तसेच गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही अशांनी जेजुरीला देवदर्शनासाठी येणे टाळावे लागणार आहे 

आजपासून जेजुरीत भाविकांची गर्दी सुरू होणार असल्याने मार्तंड देव संस्थानकडून देवदर्शन सुलभ व सुरक्षित व्हावे म्हणून नियोजनही केले आहे. यात जेजुरी गडावर पायात चप्पल घालून येणारे, मास्क न लावलेले भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. जेजुरी गडाच्या मुख्य नंदी चौकात बॅरिकेट्स लावून एकावेळी फक्त १०० भाविकांना गडावर सोडण्यात येणार आहे. त्यानंतर गडकोटाच्या मुख्य प्रवेश द्वारावर सॅनिटायझेशन, आणि  ऑक्सिमिटर, थर्मल सकॅनिंग ची सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी भाविकांची तपासणी करूनच त्यांना गडकोटात  प्रवेश दिला जाणार आहे.

देव दर्शन घेताना ही  सुरक्षित अंतर ठेवावे लागणार आहे. भविकाना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नाही. मुख्य मंदिराबाहेरील कासवावरूनच  मुख दर्शन घ्यावे लागणार आहे. मुख्य प्रवेश द्वारातून प्रवेश दिल्यानंतर दुसऱ्या दरवाजाने दर्शन घेतलेले भाविकांना बाहेर जावे लागणार आहे. भाविकांनी स्वतःच्या आरोग्याची व इतरांच्या ही आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.

 

टॅग्स :Jejuriजेजुरीcorona virusकोरोना वायरस बातम्या