लोणी काळभोर : सायकलवरून चाललेल्या एकास जीपने मागून धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन परिसरात शुक्रवारी सकाळी घडली.मारुती शिवराम कांबळे (वय ५५, रा. एंजल हायस्कूलनजीक, उरुळी कांचन) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा संतोष मारुती कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती कांबळे हे घरानजीक किराणा मालाचे दुकान चालवतात. खरेदीसाठी ते उरुळी कांचन गावात चालले होते. सायकलवरून श्रीकृष्ण मंगल कार्यालयानजीक असलेल्या मुळा-मुठा कालव्याच्या पोटचारीच्या कोपºयाजवळ आले असता मागील बाजूने जीप (एमएच ४२, के ०५२५) भरधाव वेगाने आली. तिने सायकलला धडक दिली व न थांबता सोलापूर बाजूकडे निघून गेली. या धडकेमुळे मारुती कांबळे हे महामार्गावर आपटले. त्यामुळे त्यांच्या डोक्यास व इतरत्र गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने संतोष कांबळे यांनी इतरांच्या मदतीने नजीकच्या चिंतामणी रुग्णालयात नेले. उपचार सुरू असताना ते मयत झाले.
जीपच्या धडकेत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:27 IST