शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जेईई मेन्सचा कटआॅफ घसरला

By admin | Updated: April 28, 2017 06:06 IST

जेईई मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला, मागील वर्षीच्या तुलनेत परीक्षेच्या कटआॅफमध्ये १९ गुणांनी घट झाली आहे.

पुणे : जेईई मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला, मागील वर्षीच्या तुलनेत परीक्षेच्या कटआॅफमध्ये १९ गुणांनी घट झाली आहे. मागील ४ वर्षांच्या तुलनेत ३२ गुणांनी कटआॅफमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. जेईई परीक्षेचा कटआॅफ ८१ इतका लागला आहे. देशभरातून या परीक्षेसाठी १२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यापैकी महाराष्ट्रातील १ लाख ३६ हजार विद्यार्थी, तर पुण्यातून साधारण १५ हजार विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये अक्षत चौघ हा राज्यभरातून प्रथम क्रमांकाने पात्र ठरला आहे तर देशभरातून त्याला ७वा रँक मिळाला आहे. जेईई मेन्स २०१७मध्ये मिळालेले गुण आणि आॅल इंडिया रँक्सचा उपयोग विविध एनआयटीज, आयआयटीज आणि सीएफटीआयजच्या प्रवेशाकरिता होणार आहे. यंदा निवडणुकांमुळे १२ वी बोर्ड परीक्षांना उशीर झाला, त्यामुळे जेईई मेन्स परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळाला. त्यामुळे यंदा कटआॅफ गुणांमध्ये घट झाल्याची शक्यता आहे. जेईई मेन्स ही परीक्षा ३६० गुणांची होती, त्यामध्ये खुल्या गटातून पात्र होण्यासाठी ८१ गुण, ओबीसी-एनसीएलकरिता ४९ गुण, एससीकरिता ३२ गुण आणि एसटी करिता २७ गुण आहे. जेईई पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २ लाख २० हजार इतकी आहे. कटआॅफ घसरल्याने २०१६च्या तुलनेत पात्र विद्यार्थ्यांची संख्या २० हजाराने वाढली आहे. ही परीक्षा २०१३ ते २०१५ या कालावधीमध्ये अनिवार्य होती. यंदा २०१७मध्ये एमएचटी-सीईटी ही परीक्षा महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मुख्य धरून या ६५ टक्के राज्य कोटा या परीक्षेच्या माध्यमातून ठरविला जाणार होता. यामुळे परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १५ हजारापर्यंत खाली आली आहे. चाटे ज्युनिअर कॉलेजचे ४५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. बाकलीवाल ट्युटोरिअल्सचे ३५० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे ३०५ हून अधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. (प्रतिनिधी)