शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
3
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
4
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
5
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
6
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
7
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
8
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
9
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
10
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
11
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
12
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
14
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
15
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
16
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
17
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!
18
फोनवरील 'तो' संवाद अन् ट्रम्प यांचा प्लॅन फसला; भारत-अमेरिका संबंध कसे बिघडले? सर्वात मोठा खुलासा
19
Gauri Pujan 2025: गौरी पूजेच्या वेळी माहेरवाशिणीचाही असतो मान; तिला का बोलवतात? वाचा
20
बदलीमुळे अभियंता संतापला, रागाच्या भरात पाणीपुरवठा खंडित केला; सत्य आले समोर

"जय भवानी जय शिवाजी", जयघोष; ९५ स्वराज्यरथ, शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 14:20 IST

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांच्या ९५ स्वराज्यरथांनी भव्यदिव्य मानवंदना दिली

पुणे : भारताच्या इतिहासातील शिवकालीन युध्दकला सादर करणाऱ्या रणरागिनी, फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ, ढोलताशा पथकाचा रणगजर, सनई-चौघडयांचे मंगलमय सूर शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा नयनरम्य वातावरणात पुण्यात चक्क शिवशाही अवतरली. 

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे. तब्बल ९५ स्वराज्यरथांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. लालमहालातील जिजाऊंच्या पुतळयाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचे यंदा १२ वे वर्ष आहे.                

भारताच्या इतिहासातील शिवकालीन युध्दकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युध्दकला सादर केली. नादब्रह्म ढोल ताशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, गोपी पवार, समीर जाधवराव, प्रवीण गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.  

सरदारांचे हे रथ सहभागी 

मिरवणुकीत मानाचा मुख्य रथ जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, नरवीर तानाजी मालुसरे, अटकवीर सरदार मानाजी पायगुडे, कान्होजी नाईक कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबकराव नाईक निंवगुणे, सरदार करंजावणे देशमुख, सरदार चांगोजी कडु, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुर्याजी काकडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत राजे जाधव व राजे जाधवराव,, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला, श्रीमंत धार राजेपवार, श्रीमंत गायकवाड सरकार, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बर्हिजी नाईक, शिवरत्न शिवा काशीद जीवा महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, श्रीमंत भोईटे, सरदार मांढरे,  स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे,शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे,पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, सरलष्कर खंडोजी दरेकर, स्वराज्याचे शिलेदार कुंजीर, स्वराज्यनिष्ठ शेळके, सरदार फडतरे, राजे साळुंखे चालुक्य राजवंश, स्वराज्यनिष्ठ सरदार बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार काळे, वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वराज्यरथ आपआपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी झाले. 

टॅग्स :PuneपुणेShivjayantiशिवजयंतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSocialसामाजिक