पुणे : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्व. इंदूमती बन्सीलाल संचेती ट्रस्टतर्फे मतदान जगजागृती अभियान राबवून लोकशाही बळकट करण्याचा संदेश देण्यात आला. २६ आणि २७ जानेवारीला मार्के ट यार्ड आणि सातारा रस्ता येथे हे अभियान राबविण्यात आले. ज्या दिवशी लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याच दिवशी लोकशाही बळकट करण्यासाठीच्या या अभिनव आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.चला मतदान करू, लोकशाही बळकट करू,असा संदेश देत, तिरंगा फडकावत ही जनजागृती करण्यात आली. यावेळी अभय संचेती म्हणाले, आजच्या दिवशी देशात राज्यघटना लागू झाली आणि खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित झाली. योगायोगाने महापालिकेची निवडणूक याच कालावधीत होत असल्याने लोकशाही अधिक बळकट व्हावी, यासाठी जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जनजागृती करीत आहोत. मतदानाच्या दिवशी सुटी असली तरी नागरिकांनी प्रथम मतदानाचा हक्क बजावावा.यावेळी मनीष संचेती, विजय शिंगवी, जेठमल दाधीच, कांतीलाल श्रीश्रीमाळ, सुभाष पगारीया, सतीश लुनिया, हरकचंद देसर्डा, सूर्यकांत झेंडे, विकास सावंत आदी उपस्थित होते.
मतदान करण्याचा जागर
By admin | Updated: January 28, 2017 00:07 IST