शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
2
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
3
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
4
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
5
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
6
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
7
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
8
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
10
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
11
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
12
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
13
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
14
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
15
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
16
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
17
नाशिकमध्ये सहा महिन्यांमध्ये १७ बलात्कार, अत्याचार होतात, गुन्हेही दाखल; पण...
18
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
19
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम
20
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!

अश्विनीच्या मृत्यूने ‘जे’ ब्लॉक स्तब्ध

By admin | Updated: January 21, 2015 00:31 IST

एमआयडीसीतील ‘जे’ ब्लॉक परिसर अक्षरश: स्तब्ध झाला. अश्विनीबाबत हळहळ व्यक्त होत असताना पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

पिंपरी : छेडछाड व पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे मृत्यूला कवटाळलेल्या अश्विनीने जगाचा निरोप घेतल्याची बातमी समजताच वारकड कुटुंबीय राहत असलेले इंद्रायणीनगर, तसेच त्यांचे कँटीन असलेल्या एमआयडीसीतील ‘जे’ ब्लॉक परिसर अक्षरश: स्तब्ध झाला. अश्विनीबाबत हळहळ व्यक्त होत असताना पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. इंद्रायणीनगर येथील राजवाडा परिसरात वारकड कुटुंब वास्तव्यास आहे. पती, पत्नी दोन मुलांसह राहत असलेल्या या कुटुंबाचा उदरनिर्वाह एमआयडीसीतील छोट्याशा कँटीनवर सुरू आहे. त्यामुळे दोन्ही मुले शाळेत गेली, की पतीसह पत्नीदेखील कँटीनवर जात असे. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील वारकड कुटुंबीय सुरुवातीला भोसरीतील लांडगेनगर येथे राहत होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी इंद्रायणीनगर येथे राजवाडा परिसरात भाड्याने सदनिका घेतली. नवख्या ठिकाणी आल्यानंतर कुटुंबावर अशी वेळ येईल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला असून, महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. ३१ डिसेंबरला वारकड कुटुंबीय राहत असलेल्या राजवाडा सोसायटीत अश्विनीची छेडछाड करणाऱ्यांनी गोंधळ घातला होता. पालकांना धक्काबुक्की करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून या घटनेची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. दरम्यान, २ जानेवारीला अश्विनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी रात्री अश्विनीचा मृत्यू झाल्याने इंद्रायणीनगरातील रहिवाशांना धक्काच बसला. अंत्यसंस्कारांसाठी वारकड कुटुंबीय मूळ गावी गेले असले, तरी नागरिक त्यांच्या घरासमोर गर्दी करीत आहेत. परिसरातील महिला घोळक्याने बसून या घटनेबाबत चर्चा करीत असतानाच स्वत:च्या मुलींच्या सुरक्षिततेबाबतही काळजी व्यक्त करीत आहेत. दररोज एमआयडीसीतील वारकड यांच्या कँटीनमध्ये चहा अथवा नाश्त्यासाठी जाणारे कामगार या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करीत आहेत. २ जानेवारीला घडलेल्या घटनेनंतर अश्विनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई-वडील दोघेही तिच्या जवळच असायचे. त्यामुळे २ जानेवारीपासून कँटीन बंदच आहे. (प्रतिनिधी)