शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील उद्योग पूर्व पदावर येण्यास नऊ महिने लागतील;'एमसीसीआयए'ची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 14:44 IST

क्षमतेच्या पन्नास टक्के उत्पादन सुरु

ठळक मुद्दे'एमसीसीआयए'वतीने सूक्ष्म, लघू, मध्यम आणि इतर उद्योगातील शंभर कंपन्यांची पाहणी

पिंपरी : टाळेबंदी (लॉकडाऊन) शिथील झाल्यानंतर जिल्ह्यातील उद्योग पूर्वपदावर येत असून, क्षमतेच्या पन्नास टक्के उत्पादन सुरु झाले आहे. मात्र, कोविड-१९ पुर्वीची उत्पादन पातळी गाठण्यास उद्योगांना कमीत कमी तीन महिने ते नऊ महिने कालावधी लागेल, अशी माहिती बहुतांश उद्योगांनी दिली. तर, काहींनी स्थिती पूर्वपदावर येण्यास नऊ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागणार असल्याचे सांगितले.मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) वतीने सूक्ष्म, लघू, मध्यम (एमएसएमइ) आणि इतर उद्योगातील शंभर कंपन्यांची पाहणी केली. त्यात ५३ टक्के सूक्ष्म, ४३ टक्के लघू, ११ टक्के मध्यम आणि चार टक्के मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. सर्वेक्षण केलेल्या उद्योगातील ५७ टक्के कंपन्या उत्पादन आणि २५ टक्के कंपन्या सेवा क्षेत्रातील आहेत. तर उर्वरीत कंपन्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील आहेत.

कामगारांची उपस्थिती वाढलीटाळेबंदी शिथील केल्यानंतर कामगारांची उपस्थिती हळू हळू वाढत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. जुलै महिन्यामध्ये कामगारांच्या उपस्थितीचे प्रमाण ४७ टक्के होते. ते, आॅगस्ट महिन्यामध्ये ५६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

अशी आहे उत्पादनाची स्थितीकंपन्यांमधील उत्पादनात वाढ होत आहे. जुलैमध्ये ४० टक्के असणारे उत्पादन ऑगस्ट महिन्यामध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.

भविष्यातील स्थिती काय असेल?सर्वेक्षण केलेल्या कंपन्यांना नजीकच्या भविष्यातील उत्पादनाची स्थिती काय असेल याबाबत विचारणा करण्यात आली. कोविड-१९ पुर्वी म्हणजे जानेवारी २०२० मधील उत्पादन पातळी गाठण्यास कंपन्यांना किती कालावधी लागेल असे विचारले असता १५ टक्के कंपन्यांनी ३ महिन्यांचा कालावधी लागेल असे सांगितले. मात्र, ५५ टक्के कंपन्यांनी जानेवारी २०२० मधील स्थिती गाठण्यास ३ ते ९ महिन्यांचा कालावधी लागेल असे सांगितले. तर, १५ टक्के कंपन्यांनी स्थिती पुर्वपदावर येण्यास ९ महिन्यांहून अधिक कालावधी लागेल अशी प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMIDCएमआयडीसीcorona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय