शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही महिना लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:29 IST

विकासकामांच्या खर्चाला मंजुरी देणा-या महापालिकेच्या अंदाजपत्रक समितीने अखेर समान पाणीपुरवठा योजनेच्या फेरनिविदेवर शिक्कामोर्तब केले; मात्र तरीही निविदा प्रसिद्ध व्हायला आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे

पुणे : विकासकामांच्या खर्चाला मंजुरी देणा-या महापालिकेच्या अंदाजपत्रक समितीने अखेर समान पाणीपुरवठा योजनेच्या फेरनिविदेवर शिक्कामोर्तब केले; मात्र तरीही निविदा प्रसिद्ध व्हायला आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर निविदा प्रसिद्ध करून, त्या मागवल्या जातील. छाननी करून पात्र निविदा मंजूर केली जाईल. म्हणजे प्रत्यक्ष काम सुरू व्हायला अजून तीन महिने तरी लागण्याची चिन्हे आहेत.शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनीच ही बाब स्पष्ट केली. योजनेचा खर्च २९० कोटी रुपयांनी कमी झाला आहे, एकूण २ हजार ३२५ कोटी रुपयांची निविदा झाली आहे. जलवाहिन्या, फायबर आॅप्टिकल डक्ट यात २०० कोटींची कपात झाली आहे. देखभाल-दुरुस्ती, जलवाहिन्या, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा खर्च कमी झाला. पुढील महिनाभरात निविदा काढण्यात येईल, असे वाघमारे म्हणाले.या योजनेच्या कामातच रस्त्यांमध्ये टाकण्यात येणाºया आॅप्टिकल फायबर केबलचे काम करण्यात येणार आहे. याआधीच्या निविदेत तेच काम २९७ कोटी रुपयांचे होते. चर्चेअंती तो खर्च १९० कोटी रुपयांनी कमी करण्यात आला. त्यामुळे मोठा फरक पडला आहे. योजनेतील विविध कामांसाठीच्या निविदांना प्रतिसाद मिळाल्यानंतर ठेकेदार कंपन्यांची पात्रता तपासूनच काम देण्यात येणार आहे. निविदेवर शिक्कामोर्तब झाले असले, तरी अजून काही प्रशासकीय पूर्तता शिल्लक आहे, त्याला काही काळ लागेल व नंतरच निविदा प्रसिद्ध केली जाईल.आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या योजनेत सातत्याने अडथळे येत आहे. काही विशिष्ट कंपन्यांना काम देण्याचा घाट घातला जात आहे, असे आरोप यात होत आहेत. त्यावरूनच आधीची निविदा रद्द करण्यात आली. आता फेरनिविदेला कोणत्या कंपन्या प्रतिसाद देतात, यावर विरोधकांचे बारकाईने लक्ष राहणार आहे. तसे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांनी सुचित केले आहे.

टॅग्स :Waterपाणी