शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबालाच संपविण्याच्या तयारीने ‘तो’ आला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 06:08 IST

सदाशिव पेठेत तरुणावर अ‍ॅसिड टाकून स्वत:वर गोळीबार करुन आत्महत्या केलेला सिद्धराम विजय कलशेट्टी हा त्या संपूर्ण कुटुंबाला संपविण्याच्या इराद्याने आल्याचा पोलिसांना संशय आहे़

पुणे : सदाशिव पेठेत तरुणावर अ‍ॅसिड टाकून स्वत:वर गोळीबार करुन आत्महत्या केलेला सिद्धराम विजय कलशेट्टी हा त्या संपूर्ण कुटुंबाला संपविण्याच्या इराद्याने आल्याचा पोलिसांना संशय आहे़ त्याच्याकडील बॅगेत पंच, २ कोयते आणि २ चाकू आढळले आहेत़ गावठी पिस्तुलही त्याच्याकडे होते़ त्याने या पिस्तुलातूनच रोहित थोरातसह पोलिसांवर दोन गोळ्या झाडल्या होत्या़ त्यानंतर स्वत:च्या कपाळावर मधोमध गोळी झाडून घेतली होती़ त्याच्या खिशातही काही राऊंड सापडले आहेत़कलशेट्टी याने सदाशिव पेठेत मैत्रिणीबरोबर बोलत उभ्या असलेल्या रोहित थोरात याच्या अंगावर अ‍ॅसिड टाकले व तो शेजारील आनंदी निवास इमारतीत लपून बसला़ त्याला शोधण्यासाठी आलेल्या पोलिसांवर त्याने दोन गोळ्या झाडल्या व त्यानंतर इमारतीवरुन डक्टमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली होती़ मंगळवारी रात्री उशीरा हे थरारनाट्य घडले.पोलिसांनी सांगितले, कलशेट्टी हा अक्कलकोट येथील तेलाचा व्यापारी होता़ रोहित व त्याची आई अक्कलकोटला दर्शनासाठी गेले असताना त्यांची ओळख झाली होती़ त्यातून रोहितच्या आईबरोबर त्याची फेसबुकवर मैत्री होती़ त्याने काही अश्लिल मेसेज टाकल्यामुळे रोहितच्या आईने त्याच्याविरुद्ध आॅक्टोबर २०१८ मध्ये विनयभंगाची फिर्याद दिली होती़ पोलिसांनी अटक केल्यावर तो जामीनावर सुटला होता़मंगळवारी रात्री कलशेट्टी संपूर्ण तयारीनिशी आला होता़ तो मोठे हत्याकांड करण्याच्या इराद्याने आल्याचा पोलिसांना संशय आहे़ मात्र, दारातच रोहित दिसल्याने त्याने त्याच्या अंगावर अ‍ॅसिड टाकले व त्याच्यावर गोळीबार केला़ सुदैवाने गोळी त्याच्या अंगाला चाटून गेली़ रोहितच्या प्रकृतीत सुधारणा आहे़अक्कलकोट येथील मंदिराजवळ कलशेट्टीचा हार व तेल विक्रीचा स्टॉल आहे़ रोहितच्या वडिलांचे २००९ मध्ये निधनझाले़ त्याची आई ज्योतिषविशारद आहे़ अक्कलकोटला गेले असताना त्यांची ओळख झाली होती़ कलशेट्टीलाही ज्योतिषशास्त्रात रुची असल्याने त्यांचे फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपवर बोलणे होत होते़ कलशेट्टीने ओळखीचा वेगळा अर्थ घेतल्याने रोहितच्या आईने त्याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती़ पोलिसांनी अटकही केली होती़>तीन दिवसांपूर्वी डुकरावर हल्लाकलशेट्टीने तीन दिवसांपूर्वी अक्कलकोटमध्ये डुकरावर अ‍ॅसिड हल्ला केला होता. मग त्याला कोणी कसे रोखले नाही,इतक्या सर्व शस्त्रानिशी तो आला होता, तर त्याचा आणखी काही जणांवर सूड उगवायचा हेतू होता का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.