शिरूर : शिरूर-पुणो टोलमुक्त झाला असला, तरी टोलउद्योजकाला त्याची देणी देताना रांजणगाव-गणपती चेकनाक्यावर पाच वर्षे टोलवसुली केलेली रक्कम, वाहनधारकांवरील खटल्याप्रकरणी वसुली केलेली रक्कम आदींचा विचार घेणो गरजेचे आहे. याबरोबरच 95 कोटींच्या प्रकल्पानुसार टोलआकारणी न करता पाच वर्षे 1क्5 कोटी रुपयांच्या टोलदरानुसार केलेल्या टोलआकारणीबाबतही विचार व्हायला हवा.
2क्क्5 साली बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर शिरूर-पुणो रस्त्याचे काम पूर्ण करून टोलआकारणी सुरू करण्यात आली. त्या वेळी अपूर्ण कामाच्या कारणावरून तत्कालीन कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम खेडेकर यांनी टोल बंदचे आदेश दिले.
येथपासून सुरू झालेला या रस्त्यावरील टोलवाद 2क्14ला संपला. कारण, अपूर्ण कामे असताना व या कारणावरून दोन वेळा (2क्क्5/2क्1क्) टोल बंदचे आदेश मिळूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादावर टोल सुरू राहिला. /सविस्तर वृत्त पान 7
4पाचंगे यांच्या म्हणण्यानुसार 2क्क्5 साली अधिका:याने दाखवलेली अपूर्ण कामे 71.5 कोटींची. पाहणी समितीने 2क्1क् मध्ये केलेल्या पाहणीत तेवढीच कामे अपूर्ण. मग त्याची किंमत 9 कोटी 23 लाख कशी? याबाबत शासनाने स्पष्टीकरण द्यावे.
495 कोटींच्या प्रकल्पानुसार ज्या वाहनांकडून 25 रुपये टोलआकारणी करायला हवी होती, त्यांच्याकडून 3क् रुपये वसूल केले. 45 ऐवजी 55, 9क् ऐवजी 11क्, 15क् ऐवजी 18क्, तर 19क् ऐवजी 22क् रुपये टोलवसुली करण्यात आली (वाहनप्रकारानुसार). यातील तफावतीच्या, कोटय़वधीच्या रकमेबाबतही शासनाने काय कार्यवाही केली, याचेही स्पष्टीकरण द्यावे.