शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

इराणी विद्यार्थिनीचा विनयभंग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 03:33 IST

पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघरात गुरू-शिष्य नात्याला काळिमा फासण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका नामांकित महाविद्यालयात पीएच.डी.साठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने इराणी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघरात गुरू-शिष्य नात्याला काळिमा फासण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका नामांकित महाविद्यालयात पीएच.डी.साठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने इराणी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.शिवाजी नारायण बोऱ्हाडे (वय ५३, रा. कृष्णानगर, नवी सांगवी) असे अटक केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. ३१ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला इराणची असून, २०१६मध्ये पीएच.डी.चे शिक्षण घेण्यासाठी भारतात आली. पुणे विद्यापीठात अकाऊंट विषयात पीएच.डी.साठी प्रवेश मिळावा म्हणून तिने प्रयत्न केला होता; पण तो मिळाला नाही. पीएच.डी.साठी गाईड शोधत असताना एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकाचे नाव इराणी मित्राने सुचविले. प्रबंध घेऊन ती गेली असता त्यांनी चुका काढून परत पाठविले. मंगळवारी दुपारी साडेबारा ते दीडच्या सुमारास ती बोºहाडे यांना भेटण्यासाठी गेली. महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील रूम नं. १०मध्ये ते एकटेच होते. तिथे गेल्यानंतर प्रवेश देण्यासाठी त्यांनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. घाबरलेल्या या महिलेने झालेला प्रकार मित्राला आणि पालकांना कळविला. मोबाईलमध्ये सर्व संभाषण तिने रेकॉर्ड केले आहे. बोºहाडे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.ॉमाझ्या विषयांतर्गत महाविद्यालयात एकच शिक्षक आणि दोन विद्यार्थी आहेत, असे सांगून ‘मंगळवारी दुपारी माझ्याकडे ये, आपण प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू,’ असे बोºहाडे यांनी या महिलेला सांगितले होते. याच वेळी तिचा विनयभंग केला.