शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाबाबत पाटबंधारे गाफील

By admin | Updated: February 14, 2015 03:04 IST

मागील काही वर्षांमध्ये पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष्य जाणवत असताना पाणीउपशाबाबत महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेले नियोजन काही प्रमाणात कामी येत आहे.

अंकुश जगताप, पिंपरीमागील काही वर्षांमध्ये पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष्य जाणवत असताना पाणीउपशाबाबत महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेले नियोजन काही प्रमाणात कामी येत आहे. मात्र दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची स्थिती असताना पाटबंधारे विभागाकडून पवना धरणातील जलसाठ्याचे कोणतेच पूर्वनियोजन नसल्याचे उघड झाले आहे. जुनमध्ये पाणी नियोजन करणे म्हणजे तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार सुरू असून, टंचाईकाळातही मुबलक पाण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. पिंपरी - चिंचवडला पाण्यासाठी १९६५ साली मावळ तालुक्यात पवना धरण बांधले. धरणातील पाणी साठवणूक क्षमता ९.६० टीएमसी आहे. यापैकी ८.५१ टीएमसी पाणी वापरायोग्य असून, मृतसाठ्याचे प्रमाण १.०९ टीएमसी आहे. यातून शहरासाठी पवना नदीमार्गे पाणी सोडले जाते. रावेतच्या बंधाऱ्यातून हे पाणी पंपांद्वारे उचलून शुद्धीकरणानंतर शहरभर पुरविले जाते. याच पाण्यावर नदीकाठावरील गावांतील शेती व पाणीयोजनाही अवलंबून आहेत.पावसाळ्याच्या अखेरपासून धरणातूून प्रमाणापेक्षा जादा पाणी सोडल्यास ते नदीप्रवाहावाटे वाया जाण्याचा प्रकार पवना धरणाच्या बाबतीत होत आहे. त्यातच पाऊस लांबल्याने २०१३ मध्ये याचा प्रत्यत येत पाणीकपातीचा शहरवासीयांना आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २०१२ साली ३ हजार ५०२ मिलीमीटर, २०१३ साली ४ हजार ५०७ मिलीमीटर, तर २०१४ मध्ये सर्वात कमी २ हजार ३८५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यातून धरण पूर्ण भरले. १२ फेब्रुवारीपर्यंत ५.३० टीएमसी (६२.२७ टक्के) पाणी शिल्लक आहे. इतर भागातून खास शेतीसाठी आवर्तन सोडावे लागत नसल्याने पाणी टिकविणे सोपे असण्याची जमेची बाजू आहे. मात्र कमी पर्जन्यमानामुळे या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या भागात पाण्याची कमतरता व त्यामुळे वाढत्या मागणीने उपलब्ध पाणीसाठ्यावर ताण वाढणार आहे.पावसाळ्याच्या अखेरच्या टप्यात जोरदार पाऊस पडण्याच्या अपेक्षेने सप्टेबर ते आॅक्टोबरमध्ये धरणातील ०.७५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. मात्र यानंतर जोरदार पाऊस न झाल्याने पुन्हा अपेक्षीत पाणीसाठा वाढला नाही. सध्या महापालिकेला दररोज ४४० एमएलडी पाण्याची गरज आहे. एमआयडीसीला १२० एमएलडी, पुणे महानगरपालिकेसाठी ३० एमएलडी, तळेगाव नगरपरिषदेसाठी १० एमएलडी पाणी लागते. यासह माण, मारुंजी,हिंजवडी परिसरातील आयटी पार्क, देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, शेतीसाठी पाणीवापर संस्था, नदीलगतच्या गावांच्या पेय्यजल योजनाही या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यासाठी जलविद्युत प्रकल्पावाटे बाराशे क्युसेक (१२ कोटी लिटर प्रतितास) इतक्या वेगाने ६ ते साडेसहा तास पाणी सोडले जात आहे. त्यातच पावसाळ्यापासून लहरी हवामानाचा प्रत्यय येत आहे. परिणामी या वर्षीचा पाऊस वेळेवर होईल की नाही याबाबत साशंकता आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज व मागणी आणखी वाढणार आहे. या वेळी नदीत पाणीपातळी कायम ठेवणे व त्यासाठी विसर्गात सातत्य गरजेचे आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्याचे रहिवाशांच्या सहभागासह कृती कार्यक्रमासह आतापासूनच नियोजन करण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.