शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

रेशनवर लोह अन् आयोडिनयुक्त मीठ; शासनाकडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 6:51 AM

लोह व आयोडिनयुक्त मीठ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टद्वारे शासनाकडे सादर केला होता.

पुणे : लोह व आयोडिनयुक्त मीठ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टद्वारे शासनाकडे सादर केला होता. त्यास मान्यता मिळाली असूनल पुणे जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना टाटा ट्रस्टच्या साहाय्याने प्रायोगिक तत्त्वावर मीठ वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून रेशनकार्डधारकांना १४ रुपये प्रतिकिलो या दराने मीठ मिळणार आहे.देशात व राज्यात अ‍ॅनिमियाचे प्रमाण मोठे आहे. पुरेशा प्रमाणात लोहयुक्त गोळ्या व इतर पोषकद्रव्ये दिल्यास अ‍ॅनिमिया नियंत्रणात आणता येते. त्यातच चौथ्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार सहा महिने ते पाच वर्षे वयाच्या राज्यातील ५३.८ टक्के मुलांमध्ये आणि १५ ते ४९ वर्षे वयाच्या महिलांमध्ये ४८ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात अ‍ॅनिमिया असल्याचे दिसून आले आहे. पुरेशा प्रमाणात लोहयुक्त गोळ्या व इतर पोषकद्रव्य दिल्यास अ‍ॅनिमिया नियंत्रणात आणता येते. त्याचप्रमाणे सध्या अ‍ॅनिमिया नियंत्रणाचा प्रयत्न होत आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून लोह व आयोडिनयुक्त मीठ वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव टाटा ट्रस्टद्वारे शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लोह व आयोडिनयुक्त मीठ टाटा ट्रस्टच्या सहकार्याने प्रायोगिक तत्वावर पुणे व नागपूर शहरामधील रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरीत केले जाणार आहे. हे मीठ रेशनकार्डधारकांना १४ रुपये प्रति किलो या दराने वितरीत करण्यात येणार आहे.ग्राहकांना १४ रु. किलोटाटा ट्रस्ट मार्फत प्राप्त होणारे मीठ साठविण्यासाठी गोदाम उपलब्ध करून देणे, मीठ शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यातआली आहे. टाटा ट्रस्टकडून शासनास हे मीठ ११ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होणार असून स्वस्त धान्य दुकानदारांना १२ रुपये ५० पैसे प्रति किलो दराने तर रेशनकार्डधारकांना १४ रुपये प्रतिकिलो या दराने मिळणार आहे.

टॅग्स :Puneपुणे