पुणे : पंजाब विरूद्ध दिल्ली आणि हैदराबाद विरूद्ध कलकत्ता मॅचवर सट्टा लावणाऱ्या ८ जणांना पिंपरी पोलिसांनी छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून १० मोबाईल, टीव्ही आणि ४ हजार २८० रुपये असा ८९ हजार ८८० रुपयांचा माल जप्त करण्यात आली. काळभोरनगर चिंचवड येथील हायवे टॉवर बिल्डींगच्या टेरेसवर पिंपरी पोलीस पथकाने रविवारी रात्री साडे दहा वाजता ही कारवाई केली.प्रशांत प्रभाकर माने (रा़ राजाराम काळभोर चाळ) अजित मानाजी रोहगले, अमोल सुदाम फडके (दोघे रा़ जय टॉवर, चिंचवड), किरण भाऊसाहेब वीर (रा़ आर्शिवाद चाळ), जालिंदर बन्सी रिठे (रा़ दातार चाळ), सनी सुनिल काळभोर (रा़ काळभोरनगर), राजू विलास जाधव (रा़ जय टॉवर, चिंचवड) अशी या ८ जणांची नावे आहेत़
आयपीएल मॅचवर सट्टा; ८ जण अटकेत
By admin | Updated: May 1, 2017 03:17 IST