शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या गुलटेकडी येथील 'व्हेईकल डेपो'मधील चोऱ्यांची चौकशी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 21:48 IST

चोरीच्या नावाखाली भंगार लंपास होत असल्याच्या तक्रारी 

पुणे : महापालिकेच्या गुलटेकडी येथील व्हेईकल डेपोमध्ये जुन्या आणि नादुरुस्त असलेल्या वाहनांचे कोट्यवधी रुपयांचे भंगार पडून आहे. पालिकेकडून या साहित्याचा लिलाव केला जातो. परंतु, लिलाव होऊनही लॉकडाऊन असल्याने हे साहित्य हलविण्यात आलेले नाही. उघड्यावरच पडलेल्या या साहित्यामुळे मोठ्या प्रमाणावर डेपोची जागा व्यापली असून चालू स्थितीतील वाहने बाहेर उभी करावी लागत आहेत. यासोबतच याठिकाणी वारंवार होणाऱ्या चोऱ्यांची चौकशी केली जाण्याचीही आवश्यकता आहे.

 महानगरपालिकेच्या सर्व प्रकारच्या वाहनांची देखभाल, नियोजन मोटर वाहन विभागामार्फत केले जाते. या गाड्यांचा डेपो गुलटेकडी येथील स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मध्ये आहे. डेपोमार्फत चालकांची कंत्राटी पद्धतीने सेवा घेतली जाते. व्हेईकल डेपो या ना त्या कारणाने कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. डेपोच्या कारभारावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. अनेकदा नगरसेवक आणि राजकीय पक्षांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी यापूर्वी केलेली आहे. 

व्हेईकल डेपोमधील जुन्या गाड्या, स्क्रॅप करण्यात आलेल्या वाहनांचे अवयव असे कोट्यवधींचे भंगार पडून आहे. वाहन स्क्रॅप करण्यात आल्यानंतर त्याच्या नोंदी ठेवल्या जातात असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, आजवर लाखो रुपयांचे भंगार चोरीला गेलेले आहे. चोरीच्या तक्रारी अधून मधून केल्या जातात. अधिकऱ्यांकडून चोरट्या-भुरट्यांच्या नावावर चोरी खपविली जाते. परंतु, येथील भांगराच्या चोरीची चौकशी होणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या साहित्याच्या नोंदींमध्ये तफावत असल्याचे आणि जाणीवपूर्वक खोट्या नोंदी केल्या जात असल्याचा आरोप केला आहे. ----- व्हेईकल डेपोमधील जुन्या वापरात नसलेल्या, स्क्रॅप झालेल्या वाहनांसह त्यांच्या अवयवांचे भंगार मोठ्या प्रमाणावर पडून आहे. या मालाची वारंवार चोरी होते. डेपोमधील नोंदी, आजवर झालेल्या चोऱ्या याची चौकशी केली जावी. खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या तक्रारी केल्या जात असल्याची शक्यता आहे. लिलाव प्रक्रियेमध्येही लपवाछपवी होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे या व्यवहारांची चौकशी केली जावी. - एकनाथ ढोले, जिल्हा प्रमुख, महाराष्ट्र वाहतूक सेना ----- स्क्रॅप झालेली वाहने, वाहनांचे जुने सुटे अवयव आदी भंगाराची लिलावाद्वारे विक्री केली जाते. महिन्यापूर्वीच एक कोटी ८२ लाखांचा लिलाल झाला असून लॉकडाऊनमुळे माल नेता आलेला नाही. या सर्व साहित्याच्या नोंदी ठेवण्यात येतात. चोरीच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तरीही हे साहित्य खुल्या जागेत असल्याने चोऱ्या होतात. - राजेंद्र शिपेकर, प्रभारी कार्यकारी अभियंता, मोटार वाहन विभाग

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरcommissionerआयुक्त