शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाचा आविष्कार; १६ वर्षांनी महिलेने दिला लक्ष्मी, सरस्वती अन् पार्वतीला जन्म  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 16:44 IST

बारामतीतील दाम्पत्याला लग्नानंतर १६ वर्षे त्यांना मुल झाले नाही. अपत्य प्राप्तीसाठी वैद्यकीय उपचार त्यांच्यावर सुरू होते...

बारामती : आई होणं हे कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा क्षण असतो. बारामती येथील एका दांपत्याला १६ वर्षांनंतर अपत्यप्राप्तीचा आनंद मिळाला आहे. शुक्रवारी (दि. ३०) वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष्मीच्या पावलांनी या दांपत्याच्या घरात तिळ्या अवतरल्या आहेत. या महिलेची आणि तिन्ही बाळांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉ. राजेश कोकोरे यांनी सांगितले. 

डॉ. राजेश कोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीतील एक दाम्पत्याला लग्नानंतर १६ वर्षे त्यांना मुल झाले नाही. अपत्य प्राप्तीसाठी वैद्यकीय उपचार त्यांच्यावर सुरू होते. अशातच टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरले. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर सोनोग्राफीच्या तपासणीमध्ये महिलेल्या गर्भाशयाच तीन गर्भ रूजल्याचे लक्षात आले.

महिलेचे वय पाहता डॉ. कोकोरे यांनी त्यांना गर्भपाताचा सल्ला दिला होता. मात्र इतक्या वर्षांनंतर आपल्या गर्भात आपले एक नाही तर तीन-तीन बाळं वाढत असल्याने या महिलेला व पतीलाही आपल्या होणाºया बाळांविषयी प्रचंड ओढ निर्माण झाली होती. डॉक्टर तुम्ही सांगता तशी काळजी घेऊ पण आम्हाला आमची तीनही बाळं हवी आहेत. असा निश्चय या दांपत्याने डॉ. कोकरे यांच्याकडे व्यक्त केला.

डॉ. कोकरे सांगतात, त्यांचा निश्चय पाहून मी आणि आमच्या स्टाफनेही ‘अपेक्षांनी भरलेलं हे आईपणाचं सुंदर ओझं अतीव व काळजीनं सांभाळायचं’ असं ठरवलं. या भगिनीची अत्यंत मायेने एका माहेरवाशिनीची काळजी घ्यावी तशी काळजी,देखभाल आम्ही आणि आमचा घेत होतो. सातव्या महिन्यामध्ये एक दोनदा या महिलेला प्रसुती कळा सुद्धा आल्या. आता काय होतंय. भीतीने जरा दडपण आले होते. परंतू, यावेळी गर्भाशयाला टाका मारुन परत आहे. गर्भातल्या तीन पणत्या कायम तेवत ठेवल्या. योग्य उपचारांमुळे तीनही बाळांची वाढ दिसामाजी चांगली होत होती. 

या दाम्पत्याला घरातल्या मंडळी, मी स्वत: माझा स्टाफ यांच्या चेहऱ्यावर काळजी आणि उत्सुकता नेहमी होती. नववा महिना सुरू झाल्यानंतर हा काळ जास्त काळजीचा होता. कोणताही धोका नको म्हणून डॉ. कोकरे यांनी आठवडाभर आधीच या महिलेला रूग्णालयात अ‍ॅडमिट करून घेतले. रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण याची वेळोवेळी तपासणी केली जात होती. या आधी देखील डॉ. राजेश कोकरे यांनी अनेक प्रसुती केल्या आहेत. त्यांच्या रूग्णालयात जुळी मुले, अवघल्या बाळंतिणीच्या प्रसुती देखील सहजतेने पार पडल्या आहेत. मात्र, यावेळी तिळी मुलं असल्याने त्यांच्यासमोर देखील आव्हान होते. ----------------------------

महिलेचे वय पाहता नैसर्गिक प्रसुती करणे धोक्याचे होते. म्हणून आम्ही सिझरचा पर्याय निवडला. त्यासाठी तयारी देखील केली. रक्ताच्या बाटल्या तयार ठेवल्या. महिलेच्या सर्व तपासण्या योग्या आल्याचे पाहून मी व माझा स्टाफ, भूलतज्ज्ञ डॉ. आनंद वणवे आम्ही सर्वांनी सिझरला सुरूवात केली. अनेक वर्षांच्या सरावामुळे पहिल्या बाळाला आम्ही सुरक्षित बाहेर काढले. यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या बाळाचा जन्म झाला. तीनही मुली होत्या. जणू लक्ष्मी, पार्वती, सरस्वती जन्माला आल्यासारखे वाटले. सध्या महिला व तीनही मुलींची प्रकृती उत्तम आहे. दोन मुलींचे वजन १.९ किलो, तर एका मुलीचे वजन १.७ किलो आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. वरद देवकाते या बाळांची सध्या काळजी घेत आहेत.  - डॉ. राजेश कोकरे, महिला आरोग्य तज्ज्ञ, बारामती

टॅग्स :BaramatiबारामतीWomenमहिलाPregnancyप्रेग्नंसी