शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अवैध १२ अर्ज ठरविले वैध; अर्ज माघारीनंतर एकूण ४ प्राचार्य बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 04:13 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकांमध्ये विद्यापीठाच्या निवडणूक विभागाने अगदी किरकोळ कारणे काढून बाद ठरवलेले १२ निवडणूक अर्ज कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी हस्तक्षेप करून वैध ठरविले आहेत.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकांमध्ये विद्यापीठाच्या निवडणूक विभागाने अगदीकिरकोळ कारणे काढून बाद ठरवलेले १२ निवडणूक अर्ज कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी हस्तक्षेप करून वैध ठरविले आहेत. अधिसभेच्या पदवीधर प्रतिनिधी व व्यवस्थापन प्रतिनिधी पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये बाद ठरविलेले ९ उमेदवारी अर्ज कुलगुरूंनी वैध ठरविले होते. त्यामुळे मागचीच पुनरावृत्ती पुन्हा झाली आहे.विद्यापीठाच्या अधिसभेवर प्राचार्य गटातून १० सदस्य, अध्यापक गटातून १० सदस्य, विद्यापीठ अध्यापकातून ३ सदस्य, विद्या परिषदेवर ८ सदस्य व प्रत्येक अभ्यास मंडळावर ३ विभागप्रमुख निवडून द्यावयाचे आहेत. यासाठीअर्ज माघारी घेण्यासाठी सोमवारची अखेरची मुदत होती. अर्जमाघारीनंतर महिला गटातून स्नेहल अग्निहोत्री या बिनविरोध निवडून आल्या आहेत.छाननीमध्ये यापूर्वीच अधिसभेवर प्राचार्य गटातून नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य मोतीराम देशमुख, इंदापूर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. बाबा सांगळे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे एकूण ४ प्राचार्यांची अधिसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.प्राचार्यांच्या खुल्या गटातील ५ जागा व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अधिसभेची निवडणूक होणार आहे. अध्यापक गटातून दहाही जागांसाठी निवडणूक होणार आहे.विद्या परिषदेच्या ८ जागांसाठी निवडणूक होईल. अधिकार मंडळांसाठी येत्या २१ जानेवारीरोजी यासाठी निवडणूक होणारअसून, मतमोजणी २३ जानेवारीरोजी आहे.११ हजार मतदार बजावणार हक्कसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळांच्या निवडणुकीमध्ये प्राचार्य गटातून ३०९ मतदार, अध्यापक गटातून १० हजार ५०० मतदार, तर विद्या परिषद गटातून १० हजार ८०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.प्राचार्य महासंघाला विकास मंचचा पाठिंबाअधिसभा निवडणुकीमध्ये प्राचार्य गटातून निवडणुकीला उभ्या राहिलेल्या प्राचार्य महासंघाच्या उमेदवारांना विद्यापीठ विकास मंचकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.तर प्राध्यापक गटातून सावित्रीबाईफुले विद्यापीठ शिक्षक संघ या संघटनेच्या उमेदवारांना मंचने पाठिंबा दिला आहे, अशी माहिती विकास मंचचे प्रांताध्यक्ष डॉ. ए. पी. कुलकर्णीयांनी दिली.प्राध्यापक गटातून पुटो व पुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ