शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खासगी क्लासमध्ये प्रवेशाचीही धाकधूक

By admin | Updated: May 10, 2017 04:26 IST

इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्याआधी विद्यार्थी व पालकांना खासगी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्याआधी विद्यार्थी व पालकांना खासगी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे. क्लासमध्ये प्रवेशासाठीही ‘मेरिट’ गरजेचे असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेत हमखास यश मिळवून देण्याचे आमिष या क्लासकडून दाखविले जात असल्याने पालकही त्याला भुलू लागले आहेत. परिणामी, विद्यार्थी व पालकांना अकरावी प्रवेशापेक्षा क्लासमधील प्रवेशाची अधिक काळजी असल्याचे दिसते.काही वर्षांपासून खासगी क्लासचे पेव फुटले आहे. इयत्ता पहिलीपासून पीएच.डी.ची तयारी करण्यापर्यंत विविध पद्धतीने खासगी क्लास आणि मार्गदर्शन वर्ग सुरू झाले आहेत. त्यातही पूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या क्लासची संख्या मोठी होती. त्यानंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी राज्य शासनाने समाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सुरू केली. मग क्लासमध्ये ‘सीईटी’ तयारीच्याही जाहिराती सुरू झाल्या.अकरावी व बारावीतील विज्ञान विषयांबरोबरच ‘सीईटी’ची तयारी करून घेण्याचे आमिष दाखविण्यात आले. सीईटी झाल्यानंतर क्लासमधील यशस्वी विद्यार्थ्यांची जाहिरातबाजी सुरू झाली. त्यामुळे विद्यार्थी व पालकही मोठ्या प्रमाणात या क्लासकडे वळू लागले. आता तर अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी राज्य सीईटी तसेच केंद्रीय पातळीवर जेईई आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ या प्रवेश परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यानुसार क्लासचीही भर पडली असून, सध्या शहरभर ठिकठिकाणी असे क्लास सुरू झाले आहेत.महाविद्यालयांमध्ये केवळ अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. तर, जेईई किंवा नीट परीक्षेसाठी थोडा कठीण अभ्यासक्रम असल्याचा गवगवा करीत अनेक खासगी क्लास विद्यार्थी व पालकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी सर्रास या क्लासमध्ये जाण्यासाठी उत्सुक दिसतात. विद्यार्थी-पालकांचा ओढा वाढू लागल्याने क्लासनी प्रवेशासाठी परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, काही क्लासकडून दहावीतील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे अकरावी प्रवेशापूर्वीच विद्यार्थी-पालकांना क्लासमध्ये प्रवेशाची चिंता लागली आहे. अकरावीचे प्रत्यक्ष प्रवेश दहावीच्या निकालानंतर काही दिवसांनी सुरू होतात; पण क्लासमध्ये प्रवेशासाठी मात्र आत्तापासूनच गर्दी वाढू लागली आहे. यामध्ये काही महाविद्यालयांनी क्लासशी करार करून वर्गातील उपस्थितीत सवलत देण्याचा चुकीचा पायंडा पाडण्यास सुरुवात केल्याने क्लासचे अधिकच फावले आहे.