शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीच्या तरुणाला आंतरराष्ट्रीय ‘आयर्नमॅन’चा किताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 18:23 IST

स्पर्धेच्या अंतिम क्षणी क्रिकेटच्या विश्वचषक मॅचप्रमाणे बारामतीकरांची उत्कंठा ताणली गेली होती. विजयी झाल्यानंतर सतीशच्या हातातील भारतीय तिरंगा ध्वज पाहून सर्वजण रोमांचित झाले.

ठळक मुद्देवयाच्या ४२ व्या वर्षी मिळविलेले यश कौतुकास्पद सतीश यास शुभेच्छा देण्यासाठी बारामती सायकल क्लबच्या सदस्यांची नुकतीच सायकलवरून अष्टविनायक यात्रा

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावरील आॅस्ट्रिया येथे पार पडलेल्या स्पर्धेत आयर्नमॅनचा बहुमान सतीश रामचंद्र ननवरे या युवकाने पटकाविला. ही स्पर्धा जगात नामांकित मानली जाते. रविवारी (दि. १) सतीश याने १२ तास ३३ मिनिटे, ४५ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली.या स्पर्धेमध्ये ३.८०० किमी पोहणे, ४२ किमी धावणे, १८० किमी सायकल चालविणे अशा तीन खडतर आव्हानांचा समावेश आहे. रविवारी सकाळी ६.४५ पासून जलतरणपासून स्पर्धेला ऱ्या सुरुवात झाली. त्यानंतर १२ तास ३३ मिनिटे ४५ सेकंदात सतीशने ध्येय गाठले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळाल्याने देशाची मान उंचावली आहे; तसेच बारामतीच्या नावलौकिकात भर पडली आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून प्रथमच बारामतीमधून सतीश याने या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पधेर्साठी गेल्या वर्षभरापासून त्याची तयारी सुरू होती. दरम्यान, काल रात्री सतीश याने मिळविलेल्या यशाची माहिती बारामतीकरांना समजली. त्यानंतर शहरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश खेचून आणणाऱ्या  सतीशवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी त्याने मिळविलेले हे यश सोशल मीडियावर सतत दंग असणाऱ्या तरुणाईला आत्मपरीक्षण करायला लावणारे असेच आहे.आॅस्ट्रिया येथील स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी कसबा येथे लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनसमोर बारामतीकरांनी गर्दी केली होती. स्पर्धेच्या अंतिम क्षणी क्रिकेटच्या विश्वचषक मॅचप्रमाणे बारामतीकरांची उत्कंठा ताणली गेली होती. विजयी झाल्यानंतर सतीशच्या हातातील भारतीय तिरंगा ध्वज पाहून सर्वजण रोमांचित झाले. भारतमाता की जय... घोषणा देऊन फटाक्यांची आताषबाजी यावेळी करण्यात आली. सतीश येथील बारामती क्लबचा सदस्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील सायकल क्लब आरोग्यदायी जीवनासाठी जनजागृती करीत आहे. सतीश यास शुभेच्छा देण्यासाठी बारामती सायकल क्लबच्या सदस्यांनी नुकतीच सायकलवरून अष्टविनायक यात्रा पूर्ण केली.आॅस्ट्रिया येथे पार पडलेल्या स्पर्धेत आयर्नमॅनचा बहुमान पटकाविल्यानंतर मित्रांनी सतीश ननवरे यास खांद्यावर घेतले. या वेळी सतीश याने भारत देशाचा तिरंगा ध्वज फडकावून विजयाचा आनंद व्यक्त केला.

टॅग्स :BaramatiबारामतीSportsक्रीडाInternationalआंतरराष्ट्रीय