शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

पोलिसांना करायचाय जप्त डेटामध्ये हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:26 IST

अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांचा आरोप : आज जामिनावर अंतिम युक्तिवाद

पुणे : एल्गार परिषदेच्या अनुषंगाने आरोपींकडून जप्त करण्यात आलेला इलेक्ट्रॉनिक डाटा नेमका किती, कशा प्रकारचा व शेवटी कधी वापरण्यात आला याबाबत अधिकृत रीडिंग असलेली कोणत्या एकाही छाप्याची हॅश व्हॅल्यू (सिक्युरिटी की) काढली नाही. कारण त्यांना संबंधित डेटामध्ये हस्तक्षेप करून काही गोष्टी त्यात अंतर्भूत करावयाच्या होत्या, असा आरोप संशयित आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी सोमवारी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात केला.

कोरेगाव-भीमा शौर्य प्रेरणा अभियानचे फेसबुक पेजवरील हॅश व्हॅल्यू पोलिसांनी काढली. कारण त्यावर आक्षेप घेता येऊ शकला असता. पण जप्त केलेल्या सीडी, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क यांची हॅश व्हॅल्यू काढण्यात आली नाही. त्यामुळे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केलेला तपास संशयास्पद असून, त्याला कोणताही आधार नसल्याचा दावा त्यांनी केला. एल्गार परिषदेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी तपास करताना सीपीआय माओवादी संघटनेशी संबंधित असल्याचे कारणावरून देशभरात विविध १४ जणांच्या घरी छापे टाकून सायबर तज्ज्ञाच्या उपस्थितीत मुद्देमाल जप्त केला होता.

गडलिंग स्वत:चा जामीन अर्जावर युक्तिवाद करताना म्हणाले, वेगवेगळ्या छाप्यादरम्यान जप्त करण्यात आलेल्या डेटाच्या क्लोन कॉपी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झाल्याचे पोलीस सांगतात, तर कधी अद्याप काही कागदपत्रे मिळवयाची असल्याचे स्पष्ट करतात. मी नक्षलवाद्यांच्या विरोधातील केसेस चालवतो. त्यामुळे मला पोलिसांनी सदर गुन्ह्यात अडकवले असून, अनेक वेळा धमकावले आहे. गडचिरोली येथील साईबाबाच्या गुन्ह्यात पोलिसांनी मला केस चालवू नको म्हणून धमकावले होते व आजही तेच सुरू आहे. आज (मंगळवार) जामिनावर अंतिम युुक्तिवाद होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.सीआरपीसी कायद्यानुसार पोलिसांना आरोपी अटक करण्याचे व छापे टाकण्याचे अधिकार आहेत. मात्र, यूएपीए कलमानुसार कारवाई करताना ठराविक अधिकाऱ्यांनाच अटक व छाप्याचे अधिकार देण्यात आले आहेत. माझ्या घरी छापे टाकणारे एसीपी व तपास अधिकारी यांना याबाबत कोणताही अधिकार नव्हता. पानसरे, दाभोलकर खून प्रकरणातील मारेकरी पुणे पोलिसांना मिळून येत नाही; मात्र ढवळे, गडलिंग, विल्सन यांचे घरी छापे मारून कारवाई दाखवता येते.४कर्नाटक पोलिसांच्या पुढाकारामुळे दाभोलकर, पानसरे केसचे धागेदोरे मिळून आले. मात्र, त्यातील प्रमुख आरोपींना शोधण्याचे काम पुणे पोलीस करीत नसून त्यांनी संबंधित खुनातील आरोपींना शोधावे.

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चा